
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपद कोण मिळवणार? यासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. हा सामना 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. (Photo- BCCI Twitter)

अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया शुक्रवारी म्हणजेच 6 मार्चच्या संध्याकाळी अहमदाबादमध्ये पोहोचली. विमानतळावरून भारतीय संघ थेट ताज हॉटेलमध्ये गेला. तिथे खेळाडूंचे जोरदार स्वागत करण्यात आले. (Photo- BCCI Twitter)

अंतिम सामन्यासाठी तयारी मजबूत करण्याचसाठी भारतीय संघ आता 7 मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सराव करेल. या सरावात बऱ्याच गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. याच मैदानात भारताने सुपर 8 फेरीचा दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना गमावला होता. (Photo- BCCI Twitter)

न्यूझीलंडचा संघ आधीच अहमदाबादमध्ये पोहोचला आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. तसेच अंतिम फेरीसाठी अहमदाबादला रवाना झाला. दक्षिण अफ्रिकेचा संघ दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 मार्च रोजी अहमदाबादमध्ये पोहोचला. (Photo- BCCI Twitter)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघांमध्ये 30 सामने झाले आहेत. त्यात भारताने 18 सामने, तर न्यूझीलंडने ११ सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये खेळलेले तिन्ही सामने भारताने गमावले आहेत. (Photo- BCCI Twitter)