वर्षाच्या शेवटी आयसीसीकडून टीम इंडियाला मिळाली गूड न्यूज, सहा खेळाडूंना मिळालं मानाचं स्थान

वर्ष 2025 संपण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना टीम इंडियाच्या खेळाडूंना आयसीसीकडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. सहा खेळाडूंना आयसीसीकडून मानाचं स्थान मिळालं आहे. चला जाणून घेऊयात काय ते..

| Updated on: Dec 31, 2025 | 4:26 PM
1 / 5
वर्ष 2025 संपताना आयसीसीने क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय क्रिकेटपटूंचा बोलाबाला दिसला. टीम इंडियाच्या सहा खेळाडूंनी नंबर 1 चं स्थान गाठलं आहे. भारतीय संघ दोन फॉर्मेटमध्ये नंबर 1 स्थानावर आहे. (PC-PTI)

2 / 5
भारतीय पुरूष क्रिकेट संघ वनडे आणि टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. तर कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिलं स्थान पटकावलं आहे. या वर्षात ऑस्ट्रेलियाने कसोटीत चांगली कामगिरी केल्याने हे फळ मिळालं आहे. (PC-PTI)

3 / 5
कसोटी क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहने नंबर 1 चं स्थान पटकावलं आहे. तर अष्टपैलू रवींद्र जडेजा ऑलराउंडर कॅटेगरीत पहिल्या स्थानावर आहे. वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्मा नंबर1 फलंदाज ठरला आहे. (PC-PTI)

4 / 5
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही फॉर्मेटमध्ये भारताचे खेळाडू आहेत. अभिषेक शर्मा नंबर 1 फलंदाज, तर वरूण चक्रवर्ती नंबर 1 गोलंदाज आहे. महिला क्रिकेटमध्ये दीप्ती शर्मा नंबर 1 गोलंदाज आहे. (PC-PTI)

5 / 5
टीम इंडियाने या वर्षी एकूण 10 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 सामन्यात विजय, 5 सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. भारताने 14 वनडे सामन्यात 11 सामने जिंकले आहेत. तर टी20 क्रिकेटमध्ये भारताला 21 पैकी 15 सामन्यात विजय मिळाला आहे. (PC-PTI)