योगायोग! आयपीएल 2025 स्पर्धेतील या शतकवीरांचं शून्याशी एक खास नातं, जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धेत डावखुऱ्या फलंदाजांनी कहर केला आहे. आतापर्यंत ठोकलेली चारही शतकं डावखुऱ्या फलंदाजांनी केली आहेत. यात तीन फलंदाज असे आहेत की त्याचं शतक आणि गोल्डन डकसोबत नातं जुळून आलं आहे.

| Updated on: May 02, 2025 | 7:32 PM
1 / 5
आयपीएल 2025 स्पर्धेत 50 सामन्याचा खेळ संपला आहे. आता प्लेऑफची शर्यत आणखी चुरशीची झाली आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांची शर्यत संपली असून उर्वरित आठ संघात लढत आहे. दुसरीकडे, या पर्वात चार शतक पाहायला मिळाली. चारही शतकं डावखुर्या फलंदाजांनी ठोकली आहे. तर तिघांची शून्यासोबत एक योग जुळून आला आहे.

2 / 5
 सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन आणि सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा यांनी शतकी खेळी केली आहे. याशिवाय पंजाब किंग्जचा सलामीवीर प्रियांश आर्य आणि राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशी यांनीही या हंगामात शतके झळकावली आहेत.

3 / 5
सनरायझर्स हैदराबादकडून पहिल्यांदाच खेळणाऱ्या इशान किशनने त्याच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 47 चेंडूत 11 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 106 धावांची नाबाद खेळी केली. या हंगामातील हे पहिले शतक होते. पुढच्याच सामन्यात, इशान किशन लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध गोल्डन डकचा बळी ठरला.

4 / 5
पंजाब किंग्जचा युवा फलंदाज प्रियांश आर्य या पर्वातील त्याच्या तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध गोल्डन डकचा बळी ठरला. पण तो निराश झाला नाही आणि चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या त्याच्या पुढच्याच सामन्यात त्याने 42 चेंडूत 7 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 103 धावा केल्या.

5 / 5
आयपीएलमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने त्याच्या तिसऱ्या सामन्यात शतक झळकावले. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या 38 चेंडूत 7 चौकार आणि 11 षटकारांच्या मदतीने 101 धावांची तुफानी खेळी केली.पण मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात शून्याचा बळी ठरला. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)