आयपीएलच्या प्लेऑफमध्ये या खेळाडूंचा वाजला डंका, विराट कोहलीची मात्र सुमार कामगिरी

आयपीएल 2025 स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांना 29 मे पासून सुरु होणार आहे. गुणतालिकेत टॉपला असलेल्या पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ थेट अंतिम फेरी गाठणार आहे. चला जाणून घेऊयात प्लेऑफमद्ये चांगली कामगिरी करणारे खेळाडू

| Updated on: May 28, 2025 | 8:12 PM
1 / 6
आयपीएल 2025 स्पर्धेच्या क्वॉलिफाय 1 सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने येणार आहेत. पण प्लेऑफच्या या सामन्यापूर्वी आतापर्यंत मैदान गाजवणाऱ्या खेळाडूंची यादी पाहूयात. त्यांच्या खेळीच्या जोरावर अंतिम फेरीचा प्रवास सुकर झाला आहे. पण या यादीत विराट कोहली आणि श्रेयस अय्यरची कामगिरी कशी आहे ते जाणून घेऊयात. (PC-PTI)

2 / 6
चेन्नई सुपर किंग्सने पाचवेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे. या संघात सुरेश रैना याने महत्त्वाच्या खेळी केल्या आहेत. सुरेश रैनाने प्लेऑफमध्ये सर्वाधिक 714 धावा केल्या आहेत. प्लेऑफच्या 24 सामन्यात 155.21 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. (PC-PTI)

3 / 6
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आहे. त्याने 23 प्लेऑफ सामन्यात 132 च्या स्ट्राईक रेटने 523 धावा केल्या आहेत. पण यंदा चेन्नई सुपर किंग्स साखळी फेरीत राहिली. इतकंच काय तर गुणतालिकेत सर्वात शेवटचा नंबर मिळाला. (PC-PTI)

4 / 6
प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल आहे. त्याने प्लेऑफमध्ये 474 धावा केल्या आहेत. 145 च्या स्ट्राईक रेटने फक्त 10 डावात त्याने ही कामगिरी केली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. एलिमिनेटर फेरीत मुंबई इंडियन्शी सामना आहे. (PC-PTI)

5 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं स्वप्न 18 व्या पर्वात पूर्ण होईल की नाही ते माहिती नाही. पण आरसीबीने प्लेऑफच्या टॉप 2 मध्ये जागा मिळवली आहे. पण प्लेऑफमध्ये विराट कोहली आकडेवारी ही चिंता वाढवणारी आहे. त्याने 15 डावात फक्त 121.78 च्या स्ट्राईक रेटने 341 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 30 पेक्षा कमी आहे. (PC-PTI)

6 / 6
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने 11 वर्षानंतर प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. त्यामुळे  श्रेयस पंजाब किंग्सचं जेतेपदाचं स्वप्न पूर्ण करेल अशी आशा क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे. दरम्यान श्रेयस अय्यर वेगवेगळ्या फ्रेंचायझीसाठी प्लेऑफमध्ये 9 सामने खेळला आहे. त्याने 42.80 सरासरीने 214 धावा केल्या आहेत. तर चारवेळा नाबाद राहिला आहे. (PC-PTI)