‘इतरांमध्ये आणि माझ्यात हाच फरक’, त्या प्रश्नानंतर गौतम गंभीरची तिखट प्रतिक्रिया
भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना रविवारपासून सुरू होत आहे. या सामन्यापूर्वी गौतम गंभीर पत्रकार परिषदेला सामोरं गेला. यावेळी त्याने टीकाकारांच्या मुद्द्यावर रोखठोक म्हणणं मांडत त्याचं ध्येय वेगळं असल्याचं सांगितलं.

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आक्रमकपणे फलंदाजीसाठी उतरत होता. त्याने विरोधी संघांना आपल्या स्वभावाचा इंगा दाखवला आहे. इतकंच काय तर त्याचा रोखठोक स्वभाव परिचयाचा आहे. प्रशिक्षकपद हाती घेतल्यानंतरही त्याचा आक्रमक बाणा कायम राहिला आहे. याचं एक उदाहरण पाहायला मिळालं आहे. (Photo: PTI)

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या दुसर्या सामन्यात गौतम गंभीरने आपला आक्रमक स्वभाव दाखवत टीकाकारांना जोरदार उत्तर दिलं. पत्रकार परिषदेत त्यांना वारंवार टीका होत असल्याचा प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्याने त्याच्या शैलीतच उत्तर दिलं. (Photo: PTI)

गौतम गंभीरने साध्या शब्दात टीकाकारांचं म्हणणं धुडकावून लावलं.गौतम गंभीर म्हणाला की, माझं काम फक्त ट्रॉफी जिंकून देणं आहे आणि त्यावरच विश्वास ठेवतो. गंभीरने स्पष्ट केलं की, 'माझ्यात आणि त्यांच्यात हाच फरक आहे. मला व्ह्यूज आणि लाईक्सची चिंता नाही.' (Photo: PTI)

टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर गौतम गंभीरचं वक्तव्य समोर आलं आहे. मागच्या काही मालिकांमध्ये भारतीय संघ या फॉर्मेट खेळताना अडचणीत दिसला आहे. त्यामुळे गौतम गंभीर टीका होत होती. (Photo: PTI)

टीम इंडियाकडे कोलंबो कसोटी सामना जिंकून किंवा ड्रॉ करून मालिका जिंकण्याची संधी आहे. जर असं झालं तर विदेशी भूमीवर गौतम गंभीरच्या कार्यकाळात भारताचा पहिला कसोटी विजय असेल. (Photo: PTI)