WTC च्या इतिहासात सर्वाधिक शतकं करणारे 5 भारतीय, पहिल्या स्थानी कोण?

Most Centuries In Wtc History Team India : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात भारत यशस्वी संघांपैकी एक आहे. भारतासाठी या स्पर्धेत सर्वाधिक शतकं करणारे 5 फलंदाज कोण आहेत? जाणून घ्या.

| Updated on: Oct 03, 2025 | 10:20 PM
1 / 6
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेला 2019 पासून सुरुवात झाली. सध्या या चॅम्पियनशीप स्पर्धेतील तिसऱ्या साखळीचा (WTC 2025-2027) थरार सुरु आहे. भारतीय संघाला आयसीसीच्या या स्पर्धेत सलग दोन्ही वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलंय. (Photo Credit :  Paul Kane/Getty Images)

2 / 6
या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत टीम इंडियाकडून सर्वाधिक शतकांचा विक्रम हा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर आहे. रोहितने निवृत्तीपर्यंत भारतासाठी या स्पर्धेच्या इतिहासात 40 कसोटी सामन्यांमधील 69 डावांमध्ये 9 शतकं झळकावली. (Photo Credit :PTI)

3 / 6
रोहितनंतर भारतासाठी डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक शतकं करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शुबमन गिल दुसऱ्या स्थानी आहे. या भारतीय कर्णधाराने या स्पर्धेतील 37 कसोटीतील 69 डावात 9 शतकं केली आहेत. (Photo Credit :PTI)

4 / 6
रोहित-शुबमननंतर या यादीत युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल तिसऱ्या स्थानी आहे. यशस्वीने 25 कसोटी सामन्यांमधील 47 डावांमध्ये 6 शतकं झळकावली आहेत. यशस्वीने विंडीज विरुद्ध 2023 साली कसोटी पदार्पण केलं होतं. (Photo Credit :PTI)

5 / 6
अनुभवी फलंदाज केएल राहुल या यादीत चौथ्या स्थानी आहे. केएलने या स्पर्धेत एकूण 6 शतकं ठोकली आहेत. केएलला या 6 शतकांसाठी 30 सामन्यांमधील 56 डाव खेळावे लागले आहेत. (Photo Credit :PTI)

6 / 6
उपकर्णधार आणि विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत या यादीत पाचव्या स्थानी आहे. पंतने 38 कसोटीतील 67 डावांमध्ये 6 शतकं झळकावली आहेत. (Photo Credit :PTI)