IPL 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीचा हाहाकार..! 12 डावात मारलेल्या षटकारांनी दोन वर्षे जुना विक्रम मोडला
आयपीएल 2026 स्पर्धेतील 62वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने आक्रमक पवित्रा दाखवत चौकार षटकारांचा वर्षावर केला. यासह त्याने आयपीएल स्पर्धेतील दोन वर्षे जुना षटकारांचा विक्रम मोडला.

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सच्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची दहशत आहे. कारण समोर असलेल्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडण्याची ताकद आहे. फलंदाजीला आला की चौकार आणि षटकारांचा वर्षाव करतो. आता त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo: PTI)

आयपीएल 2026 स्पर्धेतील 12व्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 21 चेंडूत 46 धावांची खेळी केली. त्याचं अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. या खेळीत त्याने 5 चौकार आणि तीन षटकार मारले. या षटकारांच्या जोरावर त्याने एक मोठा विक्रम नावावर केला आहे. (Photo: PTI)

आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीच्या नावावर 43 षटकारांची नोंद झाली आहे. एका पर्वात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने अभिषेक शर्माचा 42 षटकारांचा विक्रम मोडीत काढला आहे. (Photo: PTI)

अभिषेक शर्माने आयपीएल 2024 स्पर्धेत हा विक्रम रचला होता. त्याने विराट कोहलीचा 38 षटकारांचा विक्रम मोडला होता. अभिषेक शर्माही या शर्यतीत आहे. त्याने 12 डावात 37 षटकार मारले होते . (Photo: PTI)

वैभव सूर्यवंशीची नजर आता ख्रिस गेलच्या विक्रमावर आहे. ख्रिस गेलने आयपीएल 2012 मध्ये एकूण 58 षटकार मारले होते. एका पर्वात मारलेले सर्वाधिक षटकार आहेत. आतापर्यंत हा विक्रम कोणीही मोडलेला नाही. (Photo: PTI)