AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिरे, मोती आणि सोन्याचे तब्बल 4 कोटीचे घड्याळ प्रियांचा चोप्राच्या मनगटावर, थेट डायलमध्ये..

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. प्रियांका चोप्रा हिची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. प्रियांका हिने विदेशात दिवाळी पार्टीचे आयोजन केले. यादरम्यानच प्रियांकाने घातलेल्या घड्याळाची जोरदार चर्चा रंगत आहे.

हिरे, मोती आणि सोन्याचे तब्बल 4 कोटीचे घड्याळ प्रियांचा चोप्राच्या मनगटावर, थेट डायलमध्ये..
Priyanka Chopra
| Updated on: Nov 21, 2026 | 11:57 AM
Share

अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या धमाकेदार अभिनयासाठी ओळखली जाते. प्रियांका चोप्रा हिने बॉलिवूड चित्रपटांमधील धमाकेदार अभिनयानंतर आपला मोर्चा हॉलिवूड चित्रपटांकडे वळवला. प्रियांका चोप्रा आता भारतात नाहीये. ती जास्त वेळ विदेशात असते. कधीतरी प्रियांका चोप्रा भारतात येते. सिंगर निक जोनस याच्यासोबत प्रियांका चोप्राने लग्न केले. लग्नानंतर अधिक वेळ प्रियांका चोप्रा विदेशात असते. विदेशात असतानाही प्रियांका चोप्रा हिला आपल्या भारतीय सणावारांचा विसर पडला नाही. प्रियांका चोप्रा विदेशातही प्रत्येक सण आणि उत्सव साजरा करते. याचे फोटोही ती सोशल मीडियावर शेअर करते. हेच नाही तर मुलगी मालती मेरी हिला देखील ती यादरम्यान सामील करून घेते. पती निक देखील भारतीय सण साजरा करताना प्रियांकासोबत दिसतो.

त्यातच दिवाळी पार्टीचे खास आयोजन प्रियांका चोप्रा हिने आपल्या घरी केले होते. ज्याचे काही फोटोही पुढे आले. प्रियांका चोप्रा हिने तब्बल 4 कोटींची घड्याळ घातली आहे. हिरे, मोती आणि सोन्यापासून तयार झालेली घड्याळ प्रियांका चोप्रा हिने घातली. दिवाळी पार्टीदरम्यान जबरदस्त घड्याळ प्रियांका चोप्राने घातली. ही घड्याळ अशी तशी नसून तब्बल 4 कोटींची आहे.

प्रियांका चोप्रा हिने दिवाळी पार्टीत 18k Yellow Gold Rolex Daytona Rainbow ही वॉच घातली. ज्याची माहिती इंस्टाग्रामवर वॉच स्पॉटरने दिली. प्रियंका चोप्रा हिची ही घड्याळ 18 कॅरेट सोने, हिरे आणि डायलमध्ये चारही बाजूंनी इंद्रधनुष्य स्टाईल आणि नीलम लावण्यात आले. वॉच स्पॉटरने इस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले की, प्रियंका चोप्राच्या मनगटातवर असलेली घड्याळ अमेरिकन डॉलर 5 लाखाची आहे.

प्रियांका चोप्रा हिची वॉच भारतीय चलनानुसार, जवळपास 4.62 कोटी रूपयांची आहे. प्रियांका चोप्रा हिने या पार्टीत प्रॉन्स खाल्याने तिच्यावर टीका करण्यात आला. प्रियांका चोप्रा हिने आयोजित केलेल्या पार्टीत सीफूड असल्याचे दिसले. दिवाळी पार्टीत अभिनेत्रीचे पूर्ण घर फुलांनी सजले होते. दिवाळी पार्टीत निक जोनस याने व्हाईट रंगाचे कपडे घातले होते.

Follow Us
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मोठा दावा
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला; PM मोदींबाबतही मोठा दावा!
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती...
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती, दिल्ली कोर्टात महत्त्वाची सुनावणी
रायगडच्या राजकारणात ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा...
रायगडच्या राजकारणात वादा ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा, म्हणाले 'उलटी गिनती सुरू'
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा...
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; जरांगे...
Pune : पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; मनोज जरांगेंवर गंभीर आरोप!
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले...
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले, ग्राहकांना महागाईचा फटका
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको...
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको; पृथ्वीराज चव्हाणा यांसह इंडिया आघाडीची भूमिका स्पष्ट
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, तुमचं
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, 1.69 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे;
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे; राज्यभरातील हवामानाचा अंदाज...