AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : अरेरे, गिल सोबत असं घडायला नको होतं, पण टीम इंडियाने जिंकलं, जे कोणाला वाटलं नव्हतं ते न्यूझीलंडमध्ये करुन दाखवलं

IND vs NZ 1st Test Day 3 : कुठलीही टीम मायदेशात खेळते तेव्हा त्यांची बाजू वरचढ असणं स्वाभाविक आहे, कारण ते त्यांच्या देशात खेळत असतात, तिथलं वातावरण, खेळपट्टया याचा त्यांना चांगला अभ्यास असतो. पण टीम इंडियाने सर्वांचेच अंदाज चुकवले आहेत.

IND vs NZ : अरेरे, गिल सोबत असं घडायला नको होतं, पण टीम इंडियाने जिंकलं, जे कोणाला वाटलं नव्हतं ते न्यूझीलंडमध्ये करुन दाखवलं
IND vs NZ 1st TestImage Credit source: AFP/X@BCCI
| Updated on: Nov 21, 2026 | 11:51 AM
Share

India vs New Zealand 1st Test Day 3 : भारत-न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळावर पूर्णपणे भारताने वर्चस्व गाजवलं. कालच्या एक बाद 159 वरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर आज तिसऱ्या दिवसाचा खेळ संपताना भारताची स्थिती 4 बाद 486 आहे. आज भारताने दिवसभरात 327 धावा केल्या. आजच्या दिवसाच्या खेळाचं वैशिष्ट्य ठरलं ओपनर केएल राहुलचं शानदार शतक. त्याने 290 चेंडूंचा सामना करत 136 धावा केल्या. कॅप्टन शुबमन गिल सोबत जे घडलं, त्याची हुरहुर सगळ्यांच्या मनाला लागली. अवघ्या दोन रन्सनी त्याचं शतक हुकलं. शुबमन गिल 98 धावांवर बाद झाला. गिल कसोटी करिअरमधील 12 व्या शतकाच्या समीप असताना तो बोल्ड झाला.

न्यूझीलंडने पहिल्या डावात 368 धावा केल्या. टीम इंडियाकडे 118 धावांची आघाडी आहे. क्रीजवर ऋषभ पंत (नाबाद 55) आणि अंशुल कम्बोजची जोडी आहे. गिल ज्या पद्धतीने आऊट झाला ते पाहून पंतला सुद्धा आश्चर्य वाटलं. आज तिसऱ्या दिवशी देवदत्त पडिक्कलने सुद्धा अर्धशतक झळकवलं. तो 80 धावांवर बाद झाला. टीम इंडिया न्यूझीलंडपेक्षा सरस खेळतेय याचा पुरावा म्हणजे बाद झालेल्या चार फलंदाजांपैकी तिघांनी अर्धशतकं आणि एकाने शतक झळकवलय. पंत क्रीजवर आहे, त्याने सुद्धा हाफ सेंच्युरी झळकवली आहे. म्हणजे टीम इंडियाने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना विकेटसाठी रडवलं असं म्हटल्या चुकीच ठरणार नाही.

महत्वाच्या पार्टनरशिप कोणामध्ये झाल्या?

केएल राहुल SENA देशांविरुद्ध शतकं झळकवणार भारताचा पहिला ओपनर ठरला आहे. सेना देश म्हणजे दक्षिण आफ्रीका, इंग्लंड, न्यूजीलंड आणि ऑस्ट्रेलिया. राहुलचा निवडक एशियन दिग्ग्जांच्या लिस्टमध्ये समावेश झाला आहे. ज्यांनी चारही SENA देशांविरुद्ध टेस्ट मध्ये शतकं झळकवली होती. राहुलने 290 चेंडूत 9 चौकार आणि दोन षटकारांच्या बळावर 136 धावा केल्या. नाथन स्मिथने त्याला क्लीन बोल्ड केलं. राहुल आणि गिल दरम्यान तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी झाली. राहुल आणि पडिक्कल यांच्यामध्ये दुसऱ्याविकेटसाठी 165 धावांची पार्टनरशिप झाली.

View this post on Instagram

A post shared by Sony LIV (@sonylivindia)

टी20 सीरीज त्यानंतर वनडे मालिकेपाठोपाठ टेस्ट सीरीजमध्ये सुद्धा टीम इंडिया दमदार प्रदर्शन करत आहे. न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाज अशी कामगिरी करतील अशी अपेक्षा कोणालाही नसेल. पण टीम इंडियाने हे करुन दाखवलय.

Follow Us
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मोठा दावा
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला; PM मोदींबाबतही मोठा दावा!
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती...
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती, दिल्ली कोर्टात महत्त्वाची सुनावणी
रायगडच्या राजकारणात ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा...
रायगडच्या राजकारणात वादा ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा, म्हणाले 'उलटी गिनती सुरू'
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा...
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; जरांगे...
Pune : पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; मनोज जरांगेंवर गंभीर आरोप!
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले...
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले, ग्राहकांना महागाईचा फटका
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको...
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको; पृथ्वीराज चव्हाणा यांसह इंडिया आघाडीची भूमिका स्पष्ट
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, तुमचं
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, 1.69 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे;
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे; राज्यभरातील हवामानाचा अंदाज...