AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Stock Market Crash: AI चा फुगा फुटला? अमेरिकेत खळबळ! 560 लाख कोटी रुपयांचे नुकसान!

अमेरिकन बाजारपेठेत मोठी घसरण झाली असून AI संबंधित करेक्शनमुळे बाजार आता मंदीच्या टप्प्यामध्ये आला आहे. अवघ्या एका आठवड्यात बाजारामधून ६ ट्रिलियन डॉलर्सचे मूल्य नष्ट झाले आहे.

US Stock Market Crash: AI चा फुगा फुटला? अमेरिकेत खळबळ! 560 लाख कोटी रुपयांचे नुकसान!
AI Bubble Brust US Stock Market Crash 60 lakh crore rupees
| Updated on: Nov 21, 2026 | 12:09 PM
Share

अमेरिकन शेअर मार्केटमध्ये मोठी खळबळ बघायला मिळत आहे. बाजारपेठेत मोठी घसरण झाली आहे. एका आठवड्यात तब्बल 6 ट्रिलियन डॉलर्सचे मूल्य नष्ट झाले आहे. यामागे कारण आहे AI संबंधित करेक्शन! AI संबंधित करेक्शनमुळे बाजार आता मंदीच्या टप्प्यामध्ये आला आहे. अमेरिकी शेअर मार्केटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेन्सशी रिलेटेड क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांच्या व्यावसायिक भविष्याबद्दल आणि त्यांच्यातील गुंतवणुकीच्या क्षमतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. या चिंतेमुळे अमेरिकन शेअर बाजारात ही तीव्र घसरण दिसून येत आहे.

एकूण बाजारमूल्य सुमारे ६ ट्रिलियन डॉलर्सनी झाले कमी

या सगळ्या घडामोडीमुळे अमेरिकन शेअर बाजाराचे एकूण बाजारमूल्य सुमारे ६ ट्रिलियन डॉलर्सनी कमी झाले आहे. हे मूल्य भारतीय चलनात ५६० लाख कोटी रुपयांच्या बरोबर आहे. केवळ शुक्रवारीच बाजारातून १ ट्रिलियन डॉलर्सची वेल्‍थ नष्ट झाली. ‘एस अँड पी ५००’ निर्देशांकात सलग सात सत्रांत घसरण झाली असून, २०२० नंतरचा हा सर्वात मोठा सलग घसरणीचा काळ ठरला आहे.

शुक्रवारी ही घसरण अधिकच झाली

शुक्रवारी ही घसरण अधिकच जास्त झाली. एक नवीन AI कंपनी अँथ्रोपिकच्या IPO बाबत बाजारात एक आशा होती. पण हे लिस्ट झाल्यावर बाजारात मोठी घसरण झाली. शुक्रवारी गुंतवणूकदारांनी AI -संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर नफावसुली केली. या कारणांमुळे ‘नॅस्डॅक कंपोझिट’ २०२६ सालच्या आतापर्यंतच्या नुकसानीत गेला. या निर्देशांकाने गेल्या सहा वर्षांतील सर्वात वाईट आठवडा नोंदवला.

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण

दरम्यान, ‘डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज’ ९४९.७३ अंकांनी म्हणजेच जवळपास १.९३ टक्क्यांनी घसरला. हा आकडा घसरून ४८,१४७.३३ अंकांवर स्थिरावला. ‘नॅस्डॅक १००’ मध्ये ५.६ टक्क्यांची मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली.

आशियाई-अमेरिकन बाजारपेठेचा प्रभाव भारतातही

भारतात आशियाई-अमेरिकन बाजारपेठेचा प्रभाव दिसला. ‘अँथ्रोपिक’ कंपनीच्या जबरदस्त आयपीओ पदार्पणाने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला. या प्रक्रियेत ‘स्पेसएक्स’ कडे असलेला पूर्वीचा विक्रमही मोडीत निघाला आहे. AI वर कंपन्यांकडून केला जाणारा मोठा खर्च, डेटा सेंटर उभारणीचा संथ वेग आणि या क्षेत्रासाठी मिळणाऱ्या निधीत होणारी कपात, यांसारख्या गोष्टींमुळे तंत्रज्ञान कंपन्यांच्या कमाईच्या संभाव्यतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे AI क्षेत्रात मंदीचे वातावरण दिसून येत .

Follow Us
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मोठा दावा
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला; PM मोदींबाबतही मोठा दावा!
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती...
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती, दिल्ली कोर्टात महत्त्वाची सुनावणी
रायगडच्या राजकारणात ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा...
रायगडच्या राजकारणात वादा ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा, म्हणाले 'उलटी गिनती सुरू'
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा...
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; जरांगे...
Pune : पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; मनोज जरांगेंवर गंभीर आरोप!
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले...
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले, ग्राहकांना महागाईचा फटका
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको...
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको; पृथ्वीराज चव्हाणा यांसह इंडिया आघाडीची भूमिका स्पष्ट
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, तुमचं
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, 1.69 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे;
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे; राज्यभरातील हवामानाचा अंदाज...