
वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रेकडून भारतीय क्रीडाप्रेमींना बऱ्याच अपेक्षा आहेत. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे. पण यात उपकर्णधार आणि मधल्या फळीतील फलंदाज विहान मल्होत्रा सरस ठरला. त्याने या स्पर्धेत भारतासाठी पहिलं शतक ठोकलं. त्याच्या नाबाद 107 धावांमुळे भारताने 352 धावांपर्यंत मजल मारली. (Photo: Johan Rynners-ICC/ICC via Getty Images)

सुपर सिक्स फेरीत भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारताने 8 गडी गमवून 352 धावा केल्या. यात भारताकडून एक शतक आणि दोन अर्धशतकं आली. विहान मल्होत्राने 104 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं. भारतासाठी अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिलं शतक आहे. (Photo- BCCI Twitter)

विहान मल्होत्रााने 107 चेंडूत नाबद 109 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 101.87 चा होता. या वर्ल्डकप स्पर्धेतील भारताकडून सर्वात मोठी खेळी ठरली आहे. विहान मल्होत्राने अभिज्ञान कुंडूसोबत पाचव्या विकेटसाठी 115 चेंडूत 113 धावांची भागीदारी केली. तसेच अंबरिशसोबत अर्धशतकी भागीदारी केली. (Photo- Getty Images)

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेतील विहान मल्होत्राचं हे पहिलं शतक आहे. पण युथ वनडेतील त्याचं दुसरं शतक ठरलं आहे. यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्ध शतक ठोकलं होतं. (Photo- BCCI Twitter)

विहान मल्होत्रा देखील आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. आरसीबीने त्याला 30 लाखांच्या बेस प्राइसवर खरेदी केले आहे. त्याचा फॉर्म पाहता त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. (फोटो -Michael Steele/Getty Images)