IPL 2026: विराट कोहली पुन्हा एकदा 500 पार…! अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू

आयपीएल 2026 स्पर्धेतील 61व्या सामन्यात विराट कोहलीची बॅट पुन्हा एकदा तळपली. त्याने 37 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार मारत 58 धावा केल्या. या खेळीसह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: May 17, 2026 | 5:03 PM
1 / 5
आयपीएल 2026 मध्ये विराट कोहलीने बॅटने खोऱ्याने धावा काढल्या आहेत. यासह विराट कोहली आयपीएलमध्ये एकापाठोपाठ एक विक्रम रचत आहे. हंगामातील 61 व्या सामन्यात विराटने पंजाब किंग्सविरुद्ध शानदार फलंदाजी करत एक मोठा पल्ला गाठला आहे. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल 2026 मध्ये विराट कोहलीने बॅटने खोऱ्याने धावा काढल्या आहेत. यासह विराट कोहली आयपीएलमध्ये एकापाठोपाठ एक विक्रम रचत आहे. हंगामातील 61 व्या सामन्यात विराटने पंजाब किंग्सविरुद्ध शानदार फलंदाजी करत एक मोठा पल्ला गाठला आहे. (Photo: IPL/BCCI)

2 / 5

विराट कोहलीने पंजाब किंग्सविरुद्ध 37 चेंडूत 58 धावांची खेळी केली. विराट कोहलीने या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार मारले. तसेच 156.76 च्या सरासरीने धावा केल्या. पण या खेळीतील 16वी धाव विक्रमी ठरली. (Photo: IPL/BCCI)

3 / 5

विराट कोहलीने पंजाब किंग्सविरुद्ध 16 धावा करताच या पर्वात 500 धावा पूर्ण केल्या आहेत. सलग चौथ्या पर्वात विराट कोहलीने 500 धावा करण्याची कामगिरी केली आहे. तर आयपीएलच्या नऊ पर्वात 500हून अधिक धावा नोंदवल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासातील हा एक विक्रम आहे. (Photo: IPL/BCCI)

4 / 5

डेव्हिड वॉर्नर आणि केएल राहुल प्रत्येकी सात हंगामांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर शिखर धवनने पाच वेळा हा पराक्रम केला आहे. विराट कोहलीने या सर्व दिग्गजांना खूप मागे टाकले आहे. (Photo: IPL/BCCI)

5 / 5

35 वर्षांचा झाल्यानंतर तीन वेळा आयपीएल हंगामात 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकर आणि फॅफ डु प्लेसिस यांना मागे टाकले आहे, ज्यांच्या नावावर प्रत्येकी दोन हंगामात 500हून अधिक धावा आहेत. (Photo: IPL/BCCI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us