
बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आणि क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हीचा आज (1 मे) वाढदिवस आहे. अनुष्काने 36 व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

अनुष्का आणि विराट दोघे 2017 साली विवाहबद्ध झाले. अनुष्का लग्नानंतर बी टाऊनपासून दूर राहिली. विवाहाआधी विराट-अनु्ष्का या दोघांच्या लव्ह स्टोरीची फार चर्चा पाहायला मिळाली.

मात्र अनुष्काने विराटच्या आधी एका भारतीय क्रिकेटपटूला डेट केल्याची चर्चा काही वर्षांपूर्वी होती. हा क्रिकेटर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा खास मित्र आहे.

बॉलिवडूमधील पदार्पणानंतर अनुष्का शर्माचं नाव टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याच्यासह जोडलं गेलं होतं. अनुष्का-रैना डेट करत असल्याची चर्चा 2012 साली होती.

मात्र अनुष्का आणि सुरेश रैना या दोघांनी याबाबत कधीच जाहीररित्या काहीच म्हटलं नाही. त्यानंतर या दोघांच्या नावाची चर्चा कमी झाली.

त्यानंतर विराटसह अनुष्काचं नाव जोडलं गेलं. विराट आणि अनुष्का या दोघांची एका जाहीरातीदरम्यान ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि त्यानंतर दोघे प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनी 2017 साली नव्या इनिंगला सुरुवात केली. आता विराट-अनु्ष्का या दोघांना 2 अपत्य आहेत.