
दक्षिण अफ्रिकेने दुसर्या टी20 सामन्यात भारताला 51 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरला तो क्विंट डिकॉक.. त्याच्या 90 धावांच्या खेळीमुळे भारताच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिली गेली. विजयानंतर त्याने आपल्या निवृत्ती घेण्यामागचं कारण काय होतं? सांगितलं. (फोटो- Proteas Men Twitter)

"तुम्हाला तुमच्याकडे असलेली एखादी गोष्ट गेल्यावरच त्याची किंमत कळते." याच कारणामुळे क्विंटन डीकॉकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. भारताविरुद्ध 51 धावांनी विजय मिळवल्यानंतर पत्रकार परिषदेत डी कॉकने निवृत्ती मागे घेण्याचं कारण स्पष्ट केलं. (फोटो- Proteas Men Twitter)

"निवृत्ती घेण्यापूर्वी, माझी जिंकण्याची इच्छा कमी होत चालली होती, विशेषतः दक्षिण आफ्रिकेसाठी खेळताना. पण जेव्हा मी बाहेर होतो तेव्हा ती इच्छा पुन्हा जागी झाली," असं क्विंटन डीकॉक म्हणाला. (फोटो- Proteas Men Twitter)

"मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा खूप कंटाळा आला होता. म्हणून विश्रांतीची खूप गरज होती. आता मी परत आलो आहे. आता मी संघाला खूप ताकद देऊ शकतो.", असंही डीकॉकने पुढे सांगितलं. (फोटो- Proteas Men Twitter)

"आता मला शक्य तितका काळ खेळायचे आहे. जर मी खेळत राहिलो असतो तर कदाचित मी याचा विचारही केला नसता. मी लवकरच क्रिकेट सोडले असते. पण आता मी माझी कारकीर्द वाढवू शकतो. मला पूर्वीपेक्षा जास्त तंदुरुस्त वाटत आहे.", असंही डीकॉकने पुढे सांगितलं. (फोटो- Proteas Men Twitter)