Harmanpreet Kaur | आयसीसीकडून हरमनप्रीत कौर हीच्यावर मोठी कारवाई

टीम इंडियाच्या कॅप्टला ती चूक महागात पडलीय. आयसीसीने टीम इंडियाच्या कॅप्टनवर थेट बंदीच घातली आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे.

Sanjay patil | Updated on: Jul 25, 2023 | 10:07 PM
1 / 5
बांगलादेश वूमन्स विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने संतापाच्या भरात स्टंपवर बॅट मारली होती. तसेच बांगलादेश कॅप्टनसोबत ट्रॉफी शेअर करताना पंचांनाही बोलवा, असं हरमन बोलली होती. त्यानंतर आता आयसीसीने हरमनप्रीत कौरवर मोठी कारवाई केली आहे.

2 / 5

हरमनप्रीत कौरला पंचाने बाद दिल्याचा निर्णय पटला नाही. त्यामुळे हरमनने बॅट स्टंपवर मारली होती. तसेच मालिका 1-1 ने बरोबरीत राहिल्याने दोन्ही संघांच्या कर्णधारांनी एकत्र ट्रॉफी शेअर केली. तेव्हा हरमनने पंचांनाही बोलवा, असं म्हणत राग व्यक्त केला होता.

3 / 5

त्यामुळे हरमनला एकूण सामन्याच्या मानधनाच्या 75 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आला.

4 / 5

हरमनप्रीत कौरने केलेली चूकी मान्य केली. त्यामुळे कोणत्याही औपचारिक सुनावणी करण्याची गरज पडली नाही.

5 / 5

दरम्यान आता आयसीसीने हरमनप्रीतवर 2 सामन्यांची बंदी घातली आहे. त्यामुळे हरमनप्रीतला आगामी एशियन गेम्स स्पर्धेतील क्वार्टर फायनल आणि सेमी फायनलमध्ये खेळता येणार नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us