बारामतीचा गड अवघड, सुप्रिया सुळे यांचा प्रचारासाठी अनोखा फंडा, डेमू रेल्वेत जाऊन साधला…

| Updated on: Mar 19, 2024 | 12:41 PM

Pune and baramati lok sabha election 2024 | पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदार संघ चर्चेत आहे. पवार कुटुंबियांमध्येच या ठिकाणी लढत होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. यामुळे सुप्रिया सुळे आता प्रचारासाठी पूर्ण ताकदीने उतरल्या आहेत.

1 / 6
लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी बारामती लोकसभा मतदार संघात प्रचारास सुरु झाला. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी प्रचार सुरु केला होता. नणंद आणि भावजय लढतीची चर्चा सध्या सुरु आहे. दोन्ही जणांचे रोज दौरे सुरु आहेत. लोकांशी गाठीभेटी अन् संवाद सुरु आहे.

2 / 6
लोकसभा निवडणूक कार्यक्रम झाल्यानंतर काही क्षणातच सोशल मीडियावर सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारी प्रचाराचे पत्रक फिरत आहे. 'होय आपण मतदान केलच पाहिजे'असे या पत्रकावर लिहिण्यात आले आहे.

3 / 6
सुप्रिया सुळे यांच्या प्रचार पत्रकावर निवडणूक आयोगाने निवडणुकीची अधिसूचनापासून निकालापर्यंतची  माहिती दिली आहे. बारामती लोकसभा मतदार संघ तुतारी वाजविणारे चिन्ह, ताई आपल्या हक्काची. असे पत्रकावर लिहिले आहे. त्यात सुप्रिया सुळे यांचा फोटो सर्वात शेवटी मतदान दिनांक आणि वेळ या पत्रकावर  देण्यात आलीय.

4 / 6
सुनेत्रा पवार उमेदवार असल्यामुळे बारामतीचा गड सोपा नाही, हे सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आले आहे. त्यांनी प्रचारासाठी नवनवीन फंडे वापरणे सुरु केले आहे. आता सुप्रिया सुळे यांनी प्रचारासाठी पुणे ते दौंड डेमूने प्रवास केला.

5 / 6
डेमूमध्ये त्यांनी लोकांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न जाणून घेतले. आपण केलेल्या कामांची माहिती लोकांना दिली. महाविकास आघाडीचा प्रचार करत सुप्रिया सुळे दौंडला पोहोचल्या.  आज दौंड तालुक्यात सुप्रिय सुळेंचा दौरा आहे.

6 / 6
बारामती लोकसभा मतदार संघात विजय मिळवणे हे सुप्रिया सुळे यांच्यासाठीच नाही तर शरद पवार यांच्यासाठीही प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे. यामुळे शरद पवार बारामतीच्या मैदानात उतरले आहेत.