
आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने बुधवार पेठेतील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात स्वराभिषेक आयोजित करण्यात आला आहे.

अंगारकी चतुर्थी च्या निमित्ताने ब्रम्हणस्पती सूक्त अभिषेक ,गायक निखिल महामुनी यांचा स्वराभिषेक, सकाळी 8 ते 12 आणि दुपारी 2 ते 6 गणेश याग , असे विविध धार्मिक आणि काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

पहाटे 4 ते सकाळी 6 यावेळेत प्रसिद्ध गायक निखिल महामुनी यांनी श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केला. स्वराभिषेकातून तू माझा देवा , खुले देवघर ,ओंकार तव ,अन्नपूर्णा , कृष्ण सुदाम ,अष्टविनायका अशी विविध प्रकारची गीतांची पर्वणी पुणेकरांना मिळाली .

अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने मंदिराला आकर्षक सजावटीचा फुलांची आरास व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.

अंगारकी चतुर्थी 19 एप्रिल रोजी दुपारी 04:38 पासून सुरू होईल आणि 20 एप्रिल रोजी दुपारी 01:52 पर्यंत चालेल. चतुर्थीच्या उपवासात चंद्राला अर्घ्य देणे आवश्यक असल्याने चतुर्थी ज्या दिवशी रात्री येते त्याच दिवशी मानले जाते.