भारताच्या या खेळाडूचं करिअर संकटात? आकडे पाहून चिंता वाढली; 5 सामन्यांत केल्या फक्त इतक्या धावा!

भारतीय क्रिकेटचा संघ यावेळी टी-20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये जाण्याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. भारताचा एक मोठा खेळाडू संध्या चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये.

| Updated on: Feb 24, 2026 | 8:59 PM
1 / 5
टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा संघ सध्या संकटात सापडला आहे. कारण भारताला सेमी फायलनमध्ये पोहोचण्यासाठी अनेक समीकरणं जुळून येणं गरजेचं आहे. भारताच्या काही खेळाडूंनी चांगली कामगिरी न केल्याने भारतीय संघावर अशी वेळ आली आहे. याच कारणामुळे भारतीय संघातील काही खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा संघ सध्या संकटात सापडला आहे. कारण भारताला सेमी फायलनमध्ये पोहोचण्यासाठी अनेक समीकरणं जुळून येणं गरजेचं आहे. भारताच्या काही खेळाडूंनी चांगली कामगिरी न केल्याने भारतीय संघावर अशी वेळ आली आहे. याच कारणामुळे भारतीय संघातील काही खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

2 / 5

गेल्या काही सामन्यांत रिंकू सिंह या खेळाडूनेही काही खास कामगिरी केलेली नाही. रिंकू सिंहला फिनिशर म्हणून ओळखले जाते. संघ अडचणीत असताना त्याने भारताला अनेकदा एकहाती विजय मिळवून दिलेला आहे. परंतु या विश्वचषक स्पर्धेत त्याला पारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही.

3 / 5

टी-20 क्रिकेटमध्ये खेळाडूंना कमी चेंडूंमध्ये जास्त धावा कराव्या लागतात. त्यामुळे खेळाडू बाददेखील लवकरच होतात. रिंकू सिंहने यूएसएविरोधातील सामन्यात 14 चेंडूमध्ये 6 धावा केल्या. त्यानंतर नामिबिया संघाविरोधात त्याने 6 चेंडू खेळून फक्त एक धाव केली.

4 / 5

पाकिस्तानविरोधात खेळाताना तो 4 चेंडू खेळून फक्त 11 धावा करू शकला. नेदरलँडविरोधात त्याला 3 चेंडूमध्ये सहा धावा काढता आल्या. दक्षिण आफ्रिकेविरोधात तर त्याला एकही धाव काढता आलेली नाही. त्यामुळेच रिंकू सिंहच्या कामगिरीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. रिंकू सिंह या विश्वचषकात एकूण सहा सामने खेळला त्याला 24 धावादेखील करता आलेल्या नाहीत.

5 / 5

रिंकू सिंहा हा भारतासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. भारताचा विजय रिंकूच्या कामगिरीवरदेखील अवलंबून असतो. मात्र सध्या तो चांगला खेळ खेळताना दिसत नसल्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. त्यामुळे आता या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांत तो कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us