
बाजारात विविध कंपन्यांचे 5000mAh ते 7000mAh पर्यंतच्या क्षमता असलेल्या बॅटरीचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. यामुळे स्मार्टफोन अधिक वेळ वापरता येतो. मात्र, या बॅटरीची योग्य देखभाल न केल्यास काही महिन्यांतच ती खराब होण्याची शक्यता आहे.

सध्याच्या स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जर तंत्रज्ञान आहे. यामुळे काही मिनिटांत बॅटरी फुल चार्ज होते. पण योग्य काळजी न घेतल्यास बॅटरी तितक्याच वेगाने खराब होऊ शकते. त्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी जास्त काळ टिकण्यासाठी काय करावे? जाणून घ्या

मोबाईलसोबत दिलेल्या चार्जरनेच फोन चार्ज करा. कंप्यूटर, लॅपटॉप किंवा अन्य कंपन्यांचे चार्जर वापरून चार्ज केल्यास बॅटरी खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कंपनीने दिलेल्या चार्जरवरून चार्ज करा. त्यामुळे बॅटरी बराच काळ टिकते.

मोबाईल जास्त प्रमाणात वापरला की गरम होतो. त्याचा बॅटरीवरही परिणाम होतो. रॅम कमी असेल आणि जास्त वेळ गेम खेळल्यास मोबाइल गरम होतो. त्यामुळे गेम खेळणे थांबवा आणि मोबाईल थंड होईपर्यंत वापरू नका.

कार किंवा बाइकच्या चार्जरद्वारे फोनची बॅटरी चार्ज करणे शक्यतो टाळा.कारण त्यातून जास्त प्रमाणात होणारा विद्युत प्रवाह फोनच्या बॅटरीवर परिणाम करतो.

काही जण मोबाईल चार्ज करायला ठेवतात आणि रात्रभर तो चार्ज होत असते. असे करणे धोकादायक असून बॅटरी खराब होऊ शकते. त्याचा स्फोट होण्याचीही शक्यता असते. बॅटरी 100 टक्के चार्ज करण्याच्या भानगडीत पडू नका 90 टक्के चार्ज होताच बंद करा.

बाजारात वायरलेस चार्जर उपलब्ध आहेत. वायफाय, ब्लूटूथद्वारे मोबाईल चार्ज होतात. शक्यतो यापासून चार्ज न केल्यास मोबाइलची बॅटरी चांगली टिकते.