शिवसैनिकांकडून वाढदिवसांची भाईंना अनोखी भेट; सांगलीत उभारला जाणार एकनाथ शिंदेंचा पहिला भव्य पुतळा

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून त्यांना अनोखी भेट दिली जाणार आहे. सांगलीमध्ये एकनाथ शिंदे यांचा भव्य असा पुतळा उभारण्यात येणार आहे.
- एकनाथ शिंदे यांचा हा राज्यातील पहिला पुतळा असणार आहे, एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीमध्ये शिंदे यांचा भव्य पुतळा उभारण्याचा निर्धार शिवैसनिकांकडून करण्यात आला आहे.
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी ही घोषणा केली आहे.
- आपल्या नेत्यांचे पुतळे हे त्यांच्या निधनानंतर उभारले जातात, मात्र त्यांच्या हयातीत पुतळे उभारले पाहिजेत. म्हणून सांगलीमध्ये एकनाथ शिंदे यांचा भव्य असा पुतळा उभारला जाणार आहे, असं महेंद्र चंडाळे यांनी म्हटलं आहे.
- पुढे बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या पुढच्या वाढदिवसापर्यंत सांगलीमध्ये हा भव्य असा पुतळा उभारला जाईल.
- एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शिवैसैनिकांकडून ही अनोखी भेट दिली जाणार आहे, शिवसैनिकांकडून शिंदे यांचा पुतळा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
- सांगलीमध्ये एकनाथ शिंदे यांचा भव्य असा पुतळा उभारला जाणार आहे, या पुतळ्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.