Tourist Places | कुठे अथांग समुद्र, तर कुठे भक्तिरस, डिसेंबरमध्ये फिरण्याचा प्लॅन करत असाल तर या ठिकाणी नक्की जा
Tourist Places | कुठे अथंग समुद्र, तर कुठे भक्तिरस, डिसेंबरमध्ये फिरण्याचा प्लॅन करत असाल तर या ठिकाणी नक्की जा मुंबई : पर्यटनासाठी डिसेंबर हा महिना सर्वात उत्तम मानला जाते. जर तुम्हाला या गुलाबी थंडीमध्ये बाहेर फिरयला जायच असेल तर हे काही बजेट फ्रेंडली पर्याय फक्त तुमच्यासाठी. चला जाणून घेऊया. कोणती आहेत ती स्थळे.

गोवा डिसेंबरमध्ये गोव्याला जाण्याचाही विचार करू शकता. पण इतर महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात गोवा सर्वात महागडा पर्याय असू शकतो. येथे असणारा समुद्र किनारा तुम्हाला वेगळ्याच दुनियेत घेऊन जाईल. तेथे गेल्यावर समुद्रावरील शॉगमध्ये लोकल गोष्टी नक्की ट्राय करा.
- कासोल हिमाचल प्रदेशातील नदीच्याकाठी वसलेले कसोल हे छोटेसे शहर तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाईल. ट्रेकर्स, बॅकपॅकर्स आणि निसर्गप्रेमीं यांच्यासाठी हे सर्वात सुंदर जागा आहे. या ठिकाणी तुम्हाला जास्त खर्च येत नाही कमी खर्चामध्ये तुम्ही इथे जास्ती जास्त काळ राहू शकता. या ठिकाणी तुम्ही ऑक्टोबर ते जून या काळात भेट देवू शकता .
- पुद्दुचेरी तामिळनाडूच्या दक्षिण-पूर्व किनार्यावर स्थित, पुडुचेरी शहर तुम्हाला विलक्षण अनुभव देईल. येथे गेल्यानंतर तुम्हाला फ्रान्समध्ये असल्यासारखे वाटेल. सुंदरतेसोबतच येथील स्वच्छता तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते. येथे फिरण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे लागत नाही कमी पैशात तुम्ही खूप फिरु शकता.
- गोवा डिसेंबरमध्ये गोव्याला जाण्याचाही विचार करू शकता. पण इतर महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात गोवा सर्वात महागडा पर्याय असू शकतो. येथे असणारा समुद्र किनारा तुम्हाला वेगळ्याच दुनियेत घेऊन जाईल. तेथे गेल्यावर समुद्रावरील शॉगमध्ये लोकल गोष्टी नक्की ट्राय करा.
- पुष्कर राजस्थान मधील पुष्कर शहर सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध ठिकाण आहे हे सुंदर शहर आहे. हे शहर ब्रह्मा मंदिर आणि प्रसिद्ध पशु जत्रेसाठी ओळखले जाते. जर तुम्ही आध्यात्मिक आनंदाच्या शोधात असाल तर या ठिकाणी नक्की भेट द्या.
- अमृतसर सुवर्ण मंदिर अमृतसर हे सुवर्ण मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. जगभरातून यात्रेकरू आणि पर्यटक येथे येतात. जर तुम्हाला जेवणाची आवड असेल तर हे तुमच्यासाठी उत्तम राहील. अमृतसरमध्ये गेल्यावर तुम्ही छोले कुलचा लस्सी सारखे पदार्थ नक्की ट्राय करा.





