
पाकिस्तानची सरकारी पीएयए ही विमान वाहतूक कंपनी विक्री काढण्यात आली. पाकिस्तानमधीलच एका उद्योग समूहाने या विमान वाहतूक कंपनीला खरेदी केले. याच कारणामुळे आता पाकिस्तानी विमान वाहतूक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या एअर होस्टेसच्या ड्रेस कोडबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

भारतात प्रत्येक विमान वाहतूक कंपनीच्या एअर होस्टेसचा वेगळा ड्रेस कोड आहे. विमानात प्रवास करताना क्रू मेंबर्स तसेच एअर होस्टेस यांना हा ड्रेस परिधान करणे बंधनकारक असते. इंडिगो एअरलाईन्स या विमान वाहतूक कंपनीचा ड्रेस कोड हा डार्क ब्लू असतो.

एअर इंडिया या विमान वाहतूक कंपनीच्या एअर होस्टेस साडी परिधान करतात. तर पुरुष क्रू मेंबर्स निळ्या रंगाचा पँट-कोट परिधान करतात. पीआयएच्या एअर होस्टेसच्या ड्रेस कोडमध्ये अनेकदा बदल करण्यात आलेले आहेत.

सर्वात अगोदर या विमान वाहतूक कंपनीच्या एअर होस्टेससाठी फ्रेंच डिझायनर पियरे कार्डीन यांनी ड्रेसकोड तयार केला होता. 1950 साली पीआयए या पाकिस्तानी एअरलाईनचा ड्रेस कोड ट्राऊजर, डोक्याला झाकण्यासाठी ओढणी असा ठेवण्यात आला. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2016 साली पुन्हा या एअरलाईनच्या एअर होस्टेसच्या ड्रेसमध्ये बदल करण्यात आला. यावेळी ड्रेस कोडसाठी मरून रंगाची निवड करण्यात आली होती. एअर होस्टेसना परिधान करण्यासाठी एका जॅकेटचा समावेश करण्यात आला. तसेच हेड स्कार्फचाही समावेश केला गेला. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)