मुल होत नाही, मग वंध्यत्व आलं हे कधी समजावं? डॉक्टर नेमकं काय सांगतात?

, मुल होत नसल्याने अनेक पती-पत्नी डॉक्टरांकडे सल्ले घ्यायला जातात. तर अनेकांना आपण नेमकं काय करायला हवं, हेच समजत नाही. काही दाम्पत्यांना तर आपण वंध्यत्त्वाच्या अडचणीतून जात असून डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यायला हवा, हेदेखील समजत नाही.

| Updated on: Aug 23, 2025 | 9:45 PM
1 / 6
आजकाल वंध्यत्त्वाचे प्रमाण फारच वाढले आहे. बदलती जीवनशैली, धापवळीचे जीवन, अपुरी झोप आणि व्यायामचा अभाव या साऱ्या गोष्टींमुळे लग्नानंतर आपत्य होत नसल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत.

2 / 6
दरम्यान, मुल होत नसल्याने अनेक पती-पत्नी डॉक्टरांकडे सल्ले घ्यायला जातात. तर अनेकांना आपण नेमकं काय करायला हवं, हेच समजत नाही. काही दाम्पत्यांना तर आपण वंध्यत्त्वाच्या अडचणीतून जात असून डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यायला हवा, हेदेखील समजत नाही.

3 / 6
त्यामुळे मला वंध्यत्त्वाच्या समस्येनी ग्रासले असून आता डॉक्टरांकडे उपचारासाठी जायला हवे? हे कधी समजावे, याबाबत डॉ. हिमांशू रॉय यांनी सविस्तर सांगितले आहे. एबीपी हिंदीने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

4 / 6
डॉ. रॉय यांच्या म्हणण्यांनुसार एखादे दाम्पत्य कोणतेही गर्भनिरोधक न वापरता शरीरसंबंध ठेवत असेल आणि तरीदेखील सलग 12 महिने उलटूनही गर्भधारणा होत नसेल तर आपल्याला वंध्यत्त्वाची अडचण असू शकते असे गृहित धरले पाहिजे. या स्थितीला इनफर्टीलीटी असेही म्हणतात.

5 / 6
आजघडीला वैद्यकीय विज्ञान फार पुढे गेले आहे. त्यामुळे वंध्यत्त्वाच्या समस्येवर योग वेळी उपचार घेतले तर त्यावर मात करता येऊ शकते. डॉक्टरांशी नसंकोचपणे चर्चा केली पाहिजे तसेच त्यांच्या सल्ल्याचे पालन केले पाहिजे. असे केल्यास अनेक दाम्पत्याची मुल होण्याची समस्या दूर होऊ शकते.

6 / 6
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)