PHOTO | कोरोनाची चाचणी नेमकी कधी करावी? कोणती चाचणी जास्त प्रभावी ठरेल?

देशात कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. महाराष्ट्रासह, दिल्ली, पंजाब, राजस्थानसह अनेक राज्यांमधीळ कोरोना परिस्थिती भयानक होत चालली आहे (Corona test information).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:04 PM, 15 Apr 2021
PHOTO | कोरोनाची चाचणी नेमकी कधी करावी? कोणती चाचणी जास्त प्रभावी ठरेल?
कोरोनाची चाचणी नेमकी कधी करावी? कोणती चाचणी जास्त प्रभावी?

देशात कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. महाराष्ट्रासह, दिल्ली, पंजाब, राजस्थान यांसह अनेक राज्यांमधील कोरोना परिस्थिती भयानक होत चालली आहे. महाराष्ट्रात कोरोनाची साखळी तुटावी यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, कोरोनाची चाचणी केव्हा करावी किंवा कोणती चाचणी करावी, असा प्रश्न अनेकांना सध्या पडत आहे.

ताप, थकवा, गंध किंवा चव जाणं, श्वास घेण्यास अडथळा येणं हे सर्व कोरोनाचे सर्वसामान्य लक्षणं आहेत. आता नव्या कोरोना प्रकारामुळे आणखी काही लक्षणे वाढले आहेत. डोळे गुलाबी होणं, डायरिया, हगवण, व्यवस्थित ऐकू न येणं असे लक्षणे अनेक नव्या कोरोनाबाधितांमध्ये आढळत आहेत. त्यामुळे असे लक्षणे आढळत असतील तर तातडीने कोरोनाची चाचणी करुन घ्यावी. कारण लवकर निदान झाले तर उपचारही लवकर होऊन कोरोनाला थोपवता येऊ शकतो.

कोरोनाबाधितांच्या संपर्कात आला तर चाचणी करावी का? तुम्ही एखाद्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आला असाल तर काळजी घेणं जास्त जरुरीचं आहे, असं तज्ज्ञ म्हणतात. एखाद्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात तुम्ही 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आला असाल, त्या रुग्णापासून 6 फुटाचं अंतर ठेवण्यात तुम्ही असमर्थ ठरला असाल तर तुम्ही कोरोनाची चाचणी करायला हवी, असं तज्ज्ञ सांगतात.

कोणती चाचणी करावी? कोरोनाची चाचणी करण्यासाठी RT-PCR टेस्ट सर्वात योग्य आहे, असं तज्ज्ञ सांगतात. आतापर्यंत समोर आलेल्या अनेक टेस्टिंग कीटमध्ये तेच योग्य आहे. या टेस्टचा रिपोर्ट लवकर येत नाही. त्यामानाने रॅपिड अँटीजेन टेस्टचा रिपोर्ट लगेच येतो.

तुम्ही रॅपिड अँटीजेन टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला असेल आणि तुमच्यात लक्षणे असतील तर तुम्ही तातडीने RT-PCR टेस्ट करावी, असं तज्ज्ञ सांगतात.