बाबासाहेबांचं नाव पुसू देणार नाही, गर्जना करणाऱ्या माधवी जाधव कोण आहेत? थेट गिरीश महाजनांविरोधात…

नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात माधवी जाधव यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आक्षेप घेतला. त्यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

| Updated on: Jan 26, 2026 | 10:19 PM
1 / 6
नाशिक जिल्ह्यातील प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला शासकीय कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे. या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नसल्याचे बोलले जात आहे.

2 / 6
प्रजासत्ताक दिन असूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकदाही उल्लेख न केल्यामुळे माधवी जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे. कार्यक्रमस्थळीच त्यांनी महाजन यांच्यावर आक्षेप घेतला असून बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पुसून टाकले जाण्याचा प्रयत्न केला जातोय.

3 / 6
मला निलंबित केलं तरी चालेल. वेळ प्रसंगी मी मातीकाम करेन पण बाबासाहेबांचं नाव पुसू देणार नाही, असा पवित्राच त्यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे शासकीय नोकरीच्या गणवेशात असताना त्यांनी महाजन यांच्यावर आक्षेप घेतल्याने त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

4 / 6
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी मी मुद्दामहून बाबासाहेबांचे नाव टाळलेले नाही. अनावधानाने नाव घ्यायचे राहिले असेल, असे स्पष्टीकरण देत महाजन यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. परंतू आता महाजन यांच्यावर थेट आक्षेप घेणाऱ्या या माधवी जाधव कोण आहेत, असे विचारले जात आहे.

5 / 6
मिळालेल्या माहितीनुसार माधवी जाधव या माधवी जाधव या शासकीय नोकरी करतात. त्या वनखात्यात वनरक्षक या पदावर आहेत. माधवी जाधव यांच्यासोबत दर्शना सौपुरे यादेखील होत्या. त्यांनी बाबासाहेबांच्या नावाने घोषणा दिल्या आहेत.

6 / 6
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाजन यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.