Knowledge : हॉटेल किंवा ट्रेनमध्ये पांढऱ्या रंगाच्याच बेडशीट्स, खास कारण माहीत आहे का ?
हॉटेल्स आणि ट्रेनमध्ये नेहमीच पांढऱ्या बेडशीटचा वापर केला जातो हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण असं का केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का ? चला जाणून घेऊया मनोरंजक कारण

- हॉटेलच्या खोल्यांमध्ये किंवा ट्रेनच्या बर्थमध्ये नेहमीच पांढऱ्या चादरी असतात. रंगीत चादरी का ठेवल्या जात नाहीत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
- खरं तर, हा केवळ योगायोग नाहीये. त्यामागे अनेक कारणे आहेत. पांढऱ्या चादरी स्वच्छ आणि नीटनेटक्या दिसतात, मनाला शांती देतात आणि प्रवाशांना चांगला अनुभव देतात.
- याशिवाय, पांढऱ्या चादरी स्वच्छ करणे देखील सोपे आहे. म्हणूनच हॉटेल्स आणि रेल्वेमध्ये पांढऱ्या चादरींचा वापर विशेषतः केला जातो.
- स्वच्छतेची सोय – हॉटेल्स आणि ट्रेनमध्ये बेडशीट धुण्यासाठी दररोज ब्लीचचा वापर केला जातो. ब्लीचमुळे रंगीत चादरी फिकट होतात, परंतु पांढऱ्या चादरींवर त्याचा कोणताही विशेष परिणाम होत नाही. ब्लीचमुळे बेडशीट स्वच्छ, जंतूमुक्त आणि दुर्गंधीमुक्त होतात.
- डाग लगेच दिसतात – पांढऱ्या चादरींवरील घाण किंवा डाग लवकर दिसतात. त्यामुळे ते पाहिल्यानंतर कर्मचारी चादर लगेच बदलू शकतात. रंगीत चादरींवर डाग लपवले जाऊ शकतात, ज्यामुळे घाण राहू शकते.
- मानसिक शांती – पांढरा रंग शांतीचे प्रतीक आहे. मानसशास्त्रानुसार, पांढरी चादरी पाहिल्याने मन शांत होते, ताण कमी होतो आणि प्रवाशांना आराम मिळतो.
- आलिशान लूक मिळतो – पांढऱ्या चादरींमुळे खोली किंवा डबा स्वच्छ, एकसमान दिसतो आणि आलिशान लूक मिळतो.







