पाच राज्यांच्या निवडणुकीतील महत्त्वाचे 10 मुद्दे

मुंबई: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे. पाचपैकी राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश ही राज्ये भाजपच्या हातून निसटत आहेत. मिझोराम आणि तेलंगणामध्ये स्थानिक पक्ष बहुमत मिळवत आहेत. अद्याप निकालाचं अंतिम चित्र स्पष्ट झालेलं नाही. आतापर्यंत स्पष्ट झालेल्या निकालाच्या आकडेवारीवरुन काही प्रमुख मुद्दे समोर आले आहेत. 5 राज्यांच्या निवडणूक निकालातील दहा महत्वाचे मुद्दे : …

, पाच राज्यांच्या निवडणुकीतील महत्त्वाचे 10 मुद्दे

मुंबई: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे. पाचपैकी राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश ही राज्ये भाजपच्या हातून निसटत आहेत. मिझोराम आणि तेलंगणामध्ये स्थानिक पक्ष बहुमत मिळवत आहेत. अद्याप निकालाचं अंतिम चित्र स्पष्ट झालेलं नाही. आतापर्यंत स्पष्ट झालेल्या निकालाच्या आकडेवारीवरुन काही प्रमुख मुद्दे समोर आले आहेत.

5 राज्यांच्या निवडणूक निकालातील दहा महत्वाचे मुद्दे :

 1) छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 15 वर्षानंतर दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे. त्यामुळे काँग्रेस सत्तेत बसणार असल्याचे चित्र छत्तीसगडमध्ये आहे.

2) छत्तीसगडमध्ये रमन सिंहाचे चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपूर्ण राहणार आहे

3) छत्तीसगडमध्ये अजीत जोगी आणि बसपाच्या आघाडीचा काही प्रभाव  झालेला दिसत नाही, दहा जागांपर्यंतही दोन्ही पक्षांना मजल मारता आलेली नाही.

4) मध्य प्रदेशात 15 वर्ष भाजपचं सरकार आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान काँग्रेसला टक्कर देत आहेत. सुरुवातीपासून काँग्रेस आणि भाजपामध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली.

5) मध्येप्रदेशात मतमोजणीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये चांगलीच रस्सीखेच चालू आहे. भाजप 15 वर्षांची सत्ता गमावण्याची चिन्हं आहेत.

6) मध्ये प्रदेशात बसपासोबत आघाडी न करणं काँग्रेसला महागात पडत असल्याचे सिद्ध होत आहे.

7) राजस्थानमध्ये भाजपशासित वसुंधरा राजेंची सत्ता जाणार असे चित्र आहे,

8) राजस्थानमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाल्याने सचिन पायलट मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार आहेत.

9) तेलंगणामध्ये केसीआर दोन तृतीयांश बहुमता सोबत सत्तेवर बसणार असून काँग्रेस सोबतच्या आघाडीचा काही फायदा झालेला दिसत नाही.

10) मिझोराममध्ये काँग्रेसचा पराभव आणि एमएनएफचा विजय होताना दिसतोय, तर पूर्वोत्तर भारत काँग्रेसमुक्त होत असल्याचे दिसत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *