औरंगाबादमध्ये युतीचा मेळावा : उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे

औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजपचा संयुक्त मेळावा झाला. या मेळव्यात सर्वात मोठी गोष्ट घडली ती म्हणेज, शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी माघार घेतली. त्यामुळे युतीसाठी हा मेळावा आनंदाचा ठरला. खोतकरांसह विविध मुद्द्यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.   अर्जुन हा शिवसेनेचा कडवट कट्टर शिवसैनिक आहे. त्याला एकदा रावसाहेब सांगितलं, आता ते अजिबात इकडे तिकडे जाणार नाही. …

औरंगाबादमध्ये युतीचा मेळावा : उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे

औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजपचा संयुक्त मेळावा झाला. या मेळव्यात सर्वात मोठी गोष्ट घडली ती म्हणेज, शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी माघार घेतली. त्यामुळे युतीसाठी हा मेळावा आनंदाचा ठरला. खोतकरांसह विविध मुद्द्यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.

 

  1. अर्जुन हा शिवसेनेचा कडवट कट्टर शिवसैनिक आहे. त्याला एकदा रावसाहेब सांगितलं, आता ते अजिबात इकडे तिकडे जाणार नाही. आणि अर्जुनाने धनुष्य अजूनही खाली ठेवला नाही त्याला फक्त आता विरोधकांच मी डोळा दाखवून दिलेला आहे. – उद्धव ठाकरे

 

  1. रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांचा दुरावा होता. पण आता बस आता दुराव्याचा कोळसा उगाळत बसायचं नाही. – उद्धव ठाकरे

 

  1. औरंगाबाद शहरात कचऱ्याचा प्रश्न आहे, त्यावरून अनेकवेळा ‘तू तू मैं मैं’ झालं. पण आता आपली युती झालीय. आता औरंगाबाद शहरातील कचऱ्याचा प्रश्न सगळ्यांनी मिळवून सोडवला पाहिजे. – उद्धव ठाकरे

 

  1. औरंगाबाद हा भगव्याचा गड आहे. हा भगवा जर एकदा खाली उतरला तर काय होतं हे माता भगिनींना माहीत आहे. आम्ही भागव्यसाठी एकत्र आलो आहोत. – उद्धव ठाकरे

 

  1. आघाडीत कशी बिघडी झालीय आपण पाहत आहोत. तंगडीत तंगडी घालत आहेत. – उद्धव ठाकरे

 

  1. कोकणवासियांची मागणी होती, नाणार रद्द करा आम्ही रद्द केलं, मालमत्ता कर रद्द करा म्हटलं तोही झाला. भाजपने आमचे सगळे मुद्दे मान्य केले आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्नही सोडवला आहे. – उद्धव ठाकरे

 

  1. खोटं बोलून मत मिळवता येतात, पण आशीर्वाद येत नाही. खोटं बोलून मत घेतली तर मतदार जोड्याने हाणतील. – उद्धव ठाकरे

 

  1. प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांसाठी गावागावात मदत केंद्र सुरू करा, सगळ्यांना वाटलं पाहिजे यांचं आता भांडण मिटलंय. लोकांना वाटलं पाहिजे काम केलं, लोकांना वाटलं पाहिजे हेच सरकार असला पाहिजे – उद्धव ठाकरे

 

  1. शिवसेना भाजप भांडत होते, तेव्हा आघाडीतले लोक माजले होते. आता पहा कुठे सभा होतायत का त्यांच्या. – उद्धव ठाकरे

 

  1. सत्ता गोरगरिबांसाठी हवी आहे, आम्हाला आमच्या मुलाबाळांसाठी तिकीट देण्यासाठी नकोय, मला शिवसेनाप्रमुखांनी गोरगरिबांच्या मुलांची काळजी घ्यायला सांगितलं आहे. दुसऱ्यांची मुलं धुणीभांड्यासाठी वापरून घेत नाही ती पद्धत काँग्रेसमध्ये असेल, आमच्याकडे नाही – उद्धव ठाकरे

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *