गोवा काँग्रेसमध्ये उभी फूट, 15 पैकी 10 आमदार भाजपच्या वाटेवर

गोव्यातील काँग्रेसच्या 15 पैकी 10 आमदारांनी राजीनामा दिलाय आणि भाजपात जाण्याचे संकेत दिले आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

गोवा काँग्रेसमध्ये उभी फूट, 15 पैकी 10 आमदार भाजपच्या वाटेवर
Follow us
| Updated on: Jul 10, 2019 | 8:48 PM

पणजी : आधी तेलंगणा, नंतर कर्नाटक आणि गोव्यातही काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. कर्नाटकातील बंड थंड होत नाही तोपर्यंतच गोव्यातील काँग्रेसच्या 15 पैकी 10 आमदारांनी राजीनामा दिलाय आणि भाजपात जाण्याचे संकेत दिले आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पण भाजपने स्थानिक पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवलं होतं.

राजीनामा दिलेल्या आमदारांमध्ये बाबू कवलेकर, बाबुश मोनसर्राट्टे आणि त्यांची पत्नी जेनीफर मोनसर्राट्टे, टोनी फर्नांडिस, फ्रान्सिस सेल्विरा, फिलिप नेरी रॉड्रिग्स, विलफ्रेड डे सा, निलकांत हळकणकर आणि इसिदोर फर्नांडिस यांचा समावेश आहे. या आमदारांच्या राजीनाम्यामुळे सध्या सत्तेत असलेल्या भाजपची ताकत आणखी वाढणार आहे. शिवाय भाजपसोबत सत्तेत असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार आणि उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांचं पद काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गोव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी नुकताच दावा केला होता, की काँग्रेसचे 10 आमदार भाजपात येण्यासाठी इच्छुक आहेत, पण त्यांना होल्डवर ठेवलं आहे. अखेर विनय तेंडुलकर यांचा दावा खरा ठरलाय. काँग्रेसमध्ये सध्या कर्नाटकातील संकाटमुळे अस्थितरतेचं वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच तेलंगणामध्ये काँग्रेसच्या 13 आमदारांनी तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला होता.

कर्नाटकात सत्ता जाण्याचं संकट

कर्नाटकाच्या राजकारणात सध्या नाट्यमय घडामोडी सुरु आहेत. सत्ताधारी काँग्रेस-जेडीएसच्या 15 ते 16 आमदारांनी राजीनामा दिलाय आणि मुंबईत मुक्काम ठोकलाय. काँग्रेसकडून या आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. कर्नाटकचे मंत्री डी शिवकुमार या आमदारांना भेटण्यासाठी मुंबईत आले होते. पण त्यांना पोलिसांनी जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी ताब्यात घेतलं आणि जबरदस्तीने विमानतळावर नेलं. काँग्रेस-जेडीएस सरकार सध्या बहुमत गमावण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, तर भाजपनेही कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवला आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.