1100 खोल्या, 2 रेल्वे, चंद्राबाबूंच्या एका दिवसाच्या उपोषणावर किती कोटी खर्च?

1100 खोल्या, 2 रेल्वे, चंद्राबाबूंच्या एका दिवसाच्या उपोषणावर किती कोटी खर्च?

नवी दिल्ली : तेलुगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी 11 फेब्रुवारीला राजधानी दिल्लीत एक दिवसाचं उपोषण केलं. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी चंद्राबाबूंनी दिल्लीतील आंध्र भवन इथे हे उपोषण केले होते. या एक दिवसीय उपोषणावर तब्बल 10 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत आंध्र सरकारने 6 फेब्रुवारीलाच निर्देश जारी केले होते. यामध्ये विरोध प्रदर्शनासाठी ही रक्कम खर्च करण्यात येत असल्याचं म्हटंल गेलं आहे.

नवी दिल्लीत झालेल्या उपोषणासाठी आंध्र सरकारने दोन रेल्वे बूक केल्या होत्या. या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांसाठी श्रीकाकूलम आणि अनंतपूर येथून  या ट्रेन बुक करण्यात आल्या होत्या. यासाठी सरकारने खूप खर्चही केला होता. या दोन ट्रेन बूक करण्यासाठी सरकारने 1 कोटी 12 लाख रुपये खर्च केले. त्याशिवाय सरकारने थांबण्याच्या आणि खाण्या-पिण्याच्या व्यवस्थेवरही भरमसाठ खर्च केला. आंदोलनात सहभागी झालेल्यांसाठी दिल्लीमध्ये 1100 खोल्यांची व्यवस्था करण्यात आली होती. यात व्हीआयपी आणि इतर सर्वांचा समावेश होता. या सर्व सुविधांसाठी आंध्र प्रदेश सरकारने तब्बल 10 कोटी रुपयांचा खर्च केला आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळावा यासाठी आक्रमक पवित्रा घेत दिल्लीतील आंध्र भवन इथे एक दिवसीय उपोषण केले होते. ते सकाळी 8 पासून उपोषणावर बसले होते. उपोषणादरम्यान नायडूंनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं. त्यांनी मोदींवर आरोप केला की त्यांनी राजधर्माचे पालन केले नाही. 2014 साली केंद्र सरकारने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी ते पूर्ण केले नाही.

Published On - 3:12 pm, Wed, 13 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI