गडकरींच्या संपत्तीत 5 वर्षात 140 टक्क्यांनी वाढ?

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर मतदार संघातून अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार गडकरींच्या संपत्तीत 5 वर्षात तब्बल 140 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2014 साली झालेल्या निवडणुकीत गडकरींचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 66 हजार 390 रुपये होते. परंतु नुकत्याच दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार 2017-18 साली त्यांचे उत्पन्न तब्बल 6 लाख 65 हजार 730 रुपये आहे.

नितीन गडकरी यांचे गेल्या 5 वर्षातील वर्षनिहाय उत्पन्न :

  • 2013-14 : 2 लाख 66 हजार 390 रुपये
  • 2014-15 : 6 लाख एक हजार 450 रुपये
  • 2015-16 : 8 लाख 7 हजार 300 रुपये
  • 2016-17 : 7 लाख 65 हजार 730 रुपये
  • 2017-18 : 6 लाख 40 हजार 700 रुपये

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर मतदार संघातून अर्ज दाखल केला आहे. येत्या 11 एप्रिल रोजी या ठिकाणी मतदान पार पडणार आहे. यानुसार काल सोमवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. यानुसार नितीन गडकरींनी काल अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार 2017-18 या वर्षाचे वार्षिक उत्पन्न 69 लाख 38 हजार 691 रुपये इतकी आहे. तसेच गडकरींची एकूण संपत्ती 6.9 करोड इतकी असून त्यात त्यांच्या वडिलांच्या 1.96 करोड संपत्तीचाही समावेश आहे. 2014 च्या तुलनेत ही संपत्ती अधिक आहे. त्याशिवाय गडकरींकडे मुंबईतील वरळी परिसरात एक फॅल्ट असून 2014 साली त्याची किंमत 3.78 करोड रूपये होती.  परंतु आता त्याची किंमत 4.25 करोड इतकी झाली असून ती 12.5 टक्क्यांनी वाढली आहे.

त्याशिवाय त्यांची पत्नी कांचन गडकरी यांच्याकडे तब्बल 7.3 करोड रुपये इतकी संपत्ती आहे. त्यांची वार्षिक संपत्ती तब्बल 91 लाख 99 हजार 160 रुपये इतकी आहे. त्यासोबतच त्यांच्याकडे 22 लाखांचे सोन्याचे दागिनेही आहेत.

गडकरींनी दिलेल्या नवीन व जुन्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या बॅंकेतील ठेवींमध्ये घट झाली आहे. सध्या त्यांच्या बॅंकेतील अकाऊंटमध्ये फक्त 9 लाख रूपये जमा आहेत. 2014 च्या तुलनेत यात 57 टक्क्यांनी घट झाली आहे. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर त्यांनी एक वेगळे बॅंक अकाऊंट उघडले असून त्यात 1 लाख रुपये रक्कम जमा आहेत. त्याशिवाय शेअर बाजारात त्यांची गुंतवणूक 78 टक्क्यांनी कमी झाली असून सध्या 3.55 लाख रूपयांचे त्यांच्याकडे शेअर आहे. याशिवाय त्यांच्यावर 3 गुन्हेही दाखल झाले आहेत.

इतकेच नव्हे तर नितीन गडकरीकडे तीन गाड्या असून त्यात 10 हजार रुपयांची एक अँबिसेडर गाडी, 20 लाख रुपयांची एक होंडा कारचाही समावेश आहे. त्याशिवाय 2014 साली गडकरींवर 1.3 कोटीचे कर्ज होते. त्यात वाढ झाली असून ते 1.57 करोड इतके झाले आहे.

संबंधित बातम्या :

एन्काउंटर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची खास मुलाखत

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI