मतदानानंतर तब्बल 23 तासानंतर मतपेट्या स्ट्राँगरुमला पोहचल्या

| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान झाले. मात्र, अद्यापही काही ठिकाणी मतपेट्या स्ट्राँगरुमवर पोहोचलेल्या नाहीत. कल्याण लोकसभा मतदारसंघात मुंब्रा-कळवा येथील मतपेट्याही स्ट्राँगरुमला पोहोचल्या नसल्याची धक्कादायक माहिती दुपारी समोर आली. मतदान संपून 18 तास उलटूनही तेथील 365 मतपेट्या पोहचलेल्या नव्हत्या. मात्र आता 23 तासांनंतर या मतपेट्या डोंबिवलीतील स्ट्राँगरुममध्ये पोहचल्या आहेत. मतपेट्या न पोहोचल्याने शिवसेनेने याबाबत संशय […]

मतदानानंतर तब्बल 23 तासानंतर मतपेट्या स्ट्राँगरुमला  पोहचल्या
Follow us on

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान झाले. मात्र, अद्यापही काही ठिकाणी मतपेट्या स्ट्राँगरुमवर पोहोचलेल्या नाहीत. कल्याण लोकसभा मतदारसंघात मुंब्रा-कळवा येथील मतपेट्याही स्ट्राँगरुमला पोहोचल्या नसल्याची धक्कादायक माहिती दुपारी समोर आली. मतदान संपून 18 तास उलटूनही तेथील 365 मतपेट्या पोहचलेल्या नव्हत्या. मात्र आता 23 तासांनंतर या मतपेट्या डोंबिवलीतील स्ट्राँगरुममध्ये पोहचल्या आहेत.

मतपेट्या न पोहोचल्याने शिवसेनेने याबाबत संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी शिवसेनेने मतपेट्या येण्यास इतका उशिर का झाला? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच याची तक्रारही केली आहे. शिवसेनेचे नेते गोपाळ लांडगे यांनी या विलंबावर प्रश्न उपस्थित केले. दुसरीकडे निवडणूक अधिकारी शिवाजी कादबाने यांनी यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “पेट्यांची नोंदणी करण्यास उशीर झाल्याने या मतपेट्या स्ट्राँगरुमवर पोहोचण्यात अडथळे आले.”

कल्याण लोकसभा मतदारसंघात काल मतदान पार पडले. मतदानादरम्यान एव्हीएम मशीन बिघाड झाल्याने अनेक ठिकाणी दीड ते दोन तास मतदारांना मतदान करता आले नाही. इतकेच नाही, तर अनेक ठिकाणी मतदान यादीतून मतदारांची नावे गायब होती. कल्याण लोकसभा मतदारसंघात 45.28 टक्के मतदान झाले. मतदान संपल्यानंतर तब्बल 23 तासांनंतर मुंब्रा कळवा येथील मतपेट्या डोंबिवली येथील सावत्रीबाई फुले नाट्य मंदिरातील स्ट्राँग रुममध्ये पोहचल्या नव्हत्या. आज सायंकाळी 6 वाजता मतपेट्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे अधिकारी वर्गाने सुटकेचा श्वास घेतला आहे. तरीही शिवसेना उशीर का झाला या प्रश्नावर ठाम आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी काल (सोमवारी, 29 एप्रिलला) मतदान झाले. यात कल्याण लोकसभा मतदारसंघासह राज्यात 17 ठिकाणी मतदान झाले. कल्याण येथून भाजप-शिवसेनेकडून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील निवडणुकीच्या मैदानात आहेत. 23 मे रोजी मतदान निकाल घोषित केला जाणार आहे.

संबंधित बातम्या : 

LIVE : राज्यात कुठे कुठे ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड? 

मतदान एकाला, चिट्ठीवर नाव दुसऱ्याचेच; माजी पोलीस महासंचालकांची तक्रार

EVM मशीन रशियातून कंट्रोल होतायत : चंद्राबाबू नायडू