LIVE : राज्यात कुठे कुठे ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्यातील 17 मतदार संघामध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी मतदानासाठी हजेरी लावली आहे. मतदान केंद्राबाहेरही मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. मात्र मतदानाच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी मतदान यंत्रात (EVM) बिघाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत.  

, LIVE : राज्यात कुठे कुठे ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड?

मुरबाड येथे मतदान यंत्रात बिघाड

मुरबाड येथील मराठी जिल्हा परिषद शाळेतील ईव्हीएम मशीन बंद पडली आहे. गेले 45 मिनिटांपासून मशीन बंद पडल्यामुळे मतदारांच्या रांगेत वाढ झाली आहे. तातडीने नवीन मशीन लावून पुन्हा मतदान प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

29/04/2019,1:09PM
, LIVE : राज्यात कुठे कुठे ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड?

नेरळ येथे मतदान यंत्रात बिघाड

रायगडमधील नेरळ गावात मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाली आहे. मशीन बंद पडल्याने मतदारांच्या गर्दीतही वाढ झाली आहे.

29/04/2019,11:14AM
, LIVE : राज्यात कुठे कुठे ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड?

पालघर येथे मतदान यंत्रात बिघाड

पालघर लोकसभा मतदारसंघातील कवाडा येथे ईव्हीएम मशीन अचनाक बंद पडली आहे. ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला आहे. गेल्या 5 मिनिटापासून मशीन बंद आहे.

29/04/2019,10:02AM
, LIVE : राज्यात कुठे कुठे ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड?

डहाणू येथील मतदान यंत्रात बिघाड

डहाणू नरपड येथे मतदान केंद्रातील ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे ईव्हीएम मशीन बंद पडली आहे. 15 मिनिटापासून मशीन बंद असल्याने मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

29/04/2019,9:30AM
, LIVE : राज्यात कुठे कुठे ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड?

मावळ येथील मतदान यंत्रात बिघाड

मावळ येथील पिपंरी मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनमध्येही तांत्रिक बिघाड झाला आहे. एम. एम. स्कूल मतदान केंद्रामध्ये हा प्रकार घडला. ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने तब्बल 30 मिनिटं मतदारांचा खोळंबा झाला होता. यामुळे मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात मतदारांच्या गर्दीत वाढ झाली आहे.

29/04/2019,7:57AM
, LIVE : राज्यात कुठे कुठे ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड?

ईशान्य मुंबईतील भांडूप येथे मतदान यंत्रात बिघाड

ईशान्य मुबंईतील भांडूप व्हिलेज मनपा शाळेतील मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाली आहे. मतदानाच्या सुरुवातीला येथील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदारांच्या रांगांमध्ये वाढ झाली. यामुळे दोन बूथवरील मतदान प्रक्रियेत खोळंबा झाला आहे.

29/04/2019,7:49AM
, LIVE : राज्यात कुठे कुठे ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड?

नाशिकमधील विहितगाव येथे मतदान यंत्रात बिघाड

नाशिकमधील विहितगाव येथील मतदान केंद्रामधील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाली आहे. यामुळे मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. यामध्ये काही वृद्ध आणि अपंग मतदारही येथे मतदानासाठी आले आहेत.

29/04/2019,7:44AM

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *