AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 States Election Exit Poll 2023 : लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपला सर्वात मोठा धक्का; पाच राज्यांचा अंदाज एका क्लिकवर

Telangana, Rajasthan, MP, Chhattisgarh, Mizoram exit Poll Results 2023 : राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांचा निवडणूक निकाल रविवार 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच आज एक्झिट पोलचा अंदाज आला आहे. या अंदाजानुसार पाचपैकी चार राज्यात भाजपचा प्रचंड मोठा पराभव होताना दिसत आहे. तर काँग्रेसने पाचही राज्यात जोरदार मुसंडीमारलेली दिसत आहे.

5 States Election Exit Poll 2023 : लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपला सर्वात मोठा धक्का; पाच राज्यांचा अंदाज एका क्लिकवर
five state electionImage Credit source: TV9MARATHI
| Edited By: | Updated on: Nov 30, 2023 | 7:54 PM
Share

नवी दिल्ली | 30 नोव्हेंबर 2023 : राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकांचा एक्झिट पोल जाहीर झाला आहे. या एक्झिट पोलनुसार राजस्थान वगळता सर्वच राज्यात भाजपला धक्का बसताना दिसत आहे. तर काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसच्या हातून राजस्थान निसटताना दिसत आहे. मात्र, त्याबदल्यात काँग्रेसकडे मध्यप्रदेश येताना दिसत आहे. छत्तीसगडमध्येही काँग्रेसची सत्ता येणार आहे. तर मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटलाच पुन्हा संधी मिळताना दिसत आहे. तेलंगणात मात्र काँग्रेस आणि सत्ताधारी बीआरएस पार्टीत चुरस दिसत आहे. एकंदरीत चित्र पाहता या पाचही राज्यात भाजपला मोठा फटका बसला असून काँग्रेसला बळ मिळताना दिसत आहे.

पोल ऑफ पोल काय सांगतात –

पोल स्टार्ट

मध्यप्रदेश-

भाजप- 112-121 काँग्रेस – 106-116

राजस्थान

भाजप – 100-110 काँग्रेस – 90-100

तेलंगणा

बीआरएस – 48-58 काँग्रेस – 49-56 भाजप – 5-10

छत्तीसगड

भाजप – 35-45 काँग्रेस- 40-50

सीएनएक्स

राजस्थान

काँग्रेस- 74 भाजप – 111

तेलंगणा

बीआरएस – 52 काँग्रेस – 54 बीजेपी – 7

छत्तीसगड

काँग्रेस – 48 भाजप- 39

मध्यप्रदेश

काँग्रेस – 111 भाजप – 116

एमआयएमची साथ घ्यावी लागणार

पोलच्या अंदाजानुसार तेलंगणामध्ये काँग्रेस सर्वात पुढे आहे. मात्र, असं असलं तरी तेलंगणात ओवैसी यांचा एमआयएम हा पक्ष किंगमेकर होण्याची शक्यता आहे. तेलंगणात भाजपला फक्त 5 ते 10 जागा मिळताना दिसत आहेत. तर सत्ताधारी बीआरएसला 48 ते 58 जागा मिळताना दिसत आहे. काँग्रेसला 49 ते 59 जागा मिळताना दिसत आहे. तर एमआयएमला 6 ते 8 जागा मिळताना दिसत आहे. तेलंगणात काँग्रेसला मोठं यश मिळणार आहे. मात्र, बहुमतासाठी काही जागा कमी पडताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसला एमआयएमची साथ घ्यावी लागेल असं चित्रं आहे.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसकडे

पोल स्टार्ट एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता येताना दिसत आहे. राज्यात काँग्रेसला 40 ते 50 जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपला 35 ते 45 जागा मिळताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसचं एका राज्यात बळ वाढणार आहे.

मध्यप्रदेशात गुलाल काँग्रेसचाच

मध्यप्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. काँग्रेसला 111 ते 121 जागा तर भाजपला 106 ते 116 जागा मिळताना दिसत आहे.

राजस्थान भाजपकडे?

राजस्थान मात्र काँग्रेसच्या हातून निसटताना दिसत आहे. राजस्थानात काँग्रेसला 90 ते 100 आणि भाजपला 100 ते 110 जागा मिळताना दिसत आहेत.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...