AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : माझ्या मुलाला आमदार करा, शेतकरी महिलेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

विशेष म्हणचे माझ्या मुलाला तुम्ही आमदार केल्यानंतर तो फक्त एक रुपयाचे मानधन घेईल असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. सगरबाई गदळे (Sagarbai gadale) शेतकरी महिलेचं नाव आहे. गदळे या केज तालुक्यातील दहिफळ गावातील रहिवासी आहेत.

Eknath Shinde : माझ्या मुलाला आमदार करा, शेतकरी महिलेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
पत्रात नेमकं काय लिहिलंयImage Credit source: tv9marathi
| Updated on: Jan 23, 2023 | 9:51 AM
Share

बीड – बीडमधल्या (Beed) एका शेतकरी महिलेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्राची सगळीकडे चर्चा आहे, कारण त्याचा मुलगा श्रीकांत गदळे हा सध्या समाजकार्य करतोय, त्याला विधान पारिषदेवर आमदार करा असं त्या शेतकरी महिलेचं म्हणणं त्यांनी पत्रात लिहिलं आहे. विशेष म्हणचे माझ्या मुलाला तुम्ही आमदार केल्यानंतर तो फक्त एक रुपयाचे मानधन घेईल असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. सगरबाई गदळे (Sagarbai gadale) शेतकरी महिलेचं नाव आहे. गदळे या केज तालुक्यातील दहिफळ गावातील रहिवासी आहेत.

पत्रात नेमकं काय लिहिलंय (पत्र जसेच्या तसे)

मुख्यमंत्री शिंदे साहेब आपणास पत्र लिहीण्याचे कारण – माझ्या श्रीकांतला आमदार करा – (बाबत ).

मी सागरबाई विष्णु गदळ आपणास विनंती करते की, माझा श्रीकांत गदळ गिल्या अनेक वर्षापासून राज्यातील शेतकरी, गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर सातत्याने काम करत आहे. मात्र त्याच्याकडे कसलेही पद नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपण आपण माझ्या श्रीकांतला आमदार करा, तो 1 रुपया प्रतिमहीना काम करायला तयार आहे. माझ्या श्रीकांतला आमदार होऊन राज्यातील शेतकऱ्यांना आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करायचा आहे. एकलेच नाही तर, महाराष्ट्रातील गरीबी हटवण्यासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून गरीबीमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. हे काम माझ्या -श्रीकांतला करायचे आहेत.

Bed cm letter photo 2

पत्र

त्यासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही माझ्या श्रीकांतला आमदार करा. राज्यातील शेतकरी व गोरगरीबांची सेवा करण्यांची संधी दया, जर आपण माझ्या श्रीकांतला ही संधी दिली. तर मी तुमची खुप आभारी राहील. नक्कीच माझा श्रीकांत आपण दिलेल्या आमदारकीचा योग्य वापर राज्यातील जे प्रश्न प्रलंबीत आहेत ते सोडवण्याचा पुर्णता करणार आहे.

Bed cm letter photo 1

पत्र

या पत्रावर मुख्यमंत्री काय उत्तर देतात, त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर पत्राची सुध्दा अधिक चर्चा आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.