नवज्योतसिंह सिद्धूवर महिलेने चप्पल भिरकावली

चंदीगड : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याचा प्रकार ताजा असताना, तिकडे हरियाणातील रोहतकमध्ये पंजाबचे काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावर हल्ला झाला. सिद्धूंवर एका महिलेने चप्पल भिरकावली. याप्रकारानंतर पोलिसांनी महिलेला तातडीने ताब्यात घेतलं. दरम्यान या महिलेने भिरकावलेली चप्पल सिद्धूला लागली नाही, मात्र या प्रकाराने घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला. सिद्धू मंचावरुन जनसभेला संबोधित करत होता, त्यावेळी …

A woman tries to throw slipper at Navjot Singh Sidhu angry with him for speaking against Modi, नवज्योतसिंह सिद्धूवर महिलेने चप्पल भिरकावली

चंदीगड : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याचा प्रकार ताजा असताना, तिकडे हरियाणातील रोहतकमध्ये पंजाबचे काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावर हल्ला झाला. सिद्धूंवर एका महिलेने चप्पल भिरकावली. याप्रकारानंतर पोलिसांनी महिलेला तातडीने ताब्यात घेतलं. दरम्यान या महिलेने भिरकावलेली चप्पल सिद्धूला लागली नाही, मात्र या प्रकाराने घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला.

सिद्धू मंचावरुन जनसभेला संबोधित करत होता, त्यावेळी या महिलेने सिद्धूच्या दिशेने चप्पल फेकली. मात्र लगेचच पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं.


… म्हणून चप्पल फेकली

या चप्पलफेकीमुळे काही वेळ गोंधळ झाला. सुरक्षा रक्षकांनी महिलेला ताब्यात घेतलं. या महिलेचं नाव जितेंद्र कौर असल्याचं सांगण्यात आलं. सिद्धूची डाळ भाजपमध्ये न शिजल्याने तो काँग्रेसमध्ये गेला, असा आरोप करत महिलेने चप्पल भिरकावली असं पोलिसांनी सांगितलं.

सिद्धू पूर्वी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह यांच्यावर टीका करत होते, आता ते नरेंद्र मोदींवर करत आहेत, असं आरोपी महिलेचं म्हणणं आहे.

दरम्यान, या भाषणानंतर सिद्धू बाहेर जाण्यासाठी निघाले त्यावेळी त्यांना काही लोकांनी काळे झेंडे दाखवले, शिवाय मोदी-मोदी अशा घोषणाही दिल्या. या घोषणाबाजीमुळे काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडेबाजी झाली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *