AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AAP बनला राष्ट्रीय पक्ष, पाहा कसा मिळतो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?

आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासाठी गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत.

AAP बनला राष्ट्रीय पक्ष, पाहा कसा मिळतो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 08, 2022 | 6:27 PM
Share

मुंबई : आम आदमी पक्षाने (AAP) आज राष्ट्रीय पक्ष बनण्याचा दर्जा मिळवला आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी आज ही माहिती दिली. केजरीवाल म्हणाले की, गुजरातच्या जनतेने आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष (National Party) बनवले आहे. गुजरातमध्ये ‘आप’ला मिळालेल्या मतांच्या संख्येनुसार आप आता राष्ट्रीय पक्ष बनला आहे. अवघ्या 10 वर्षात आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्षांमध्ये सामील झाला आहे.

केजरीवाल म्हणाले की, ‘ज्यावेळी मी गुजरातमध्ये गेलो तेव्हा मला खूप प्रेम मिळाले. मी तुम्हा सर्वांचा ऋणी राहीन. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. तो गड फोडण्यात आम्ही यशस्वी झालो. गुजरातमध्ये आम्हाला 13 टक्के मते मिळाली आहेत.गुजरातच्या लाखो लोकांनी आम्हाला मतदान केले आहे. तुमच्या पाठिंब्याने आम्ही पुढच्या वेळी गड जिंकण्यात यशस्वी होऊ. आम्ही संपूर्ण मोहीम सकारात्मक पद्धतीने चालवली. कोणाला शिवीगाळ केली नाही. फक्त कामाबद्दल बोललो. हेच आम्हाला इतर पक्षांपेक्षा वेगळे ठरवते. आजवर बाकीचे पक्ष धर्म आणि जातीचे राजकारण करत आले आहेत. पक्षाच्या कामावर बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे.

देशात किती राष्ट्रीय पक्ष आहेत? (National party of india)

आम आदमी पार्टी हा देशातील 8 वा राष्ट्रीय पक्ष ठरला आहे.ज्यात काँग्रेस, भाजप, बसपा, सीपीआय, सीपीएम, एनसीपी आणि टीएमसीची नावे आहेत.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कसा मिळतो? (National party status)

राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी अनेक मानके पूर्ण करावी लागतात. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे एखाद्या पक्षाचे लोकसभेत 4 सदस्य असतील आणि लोकसभा निवडणुकीत त्याला 6 टक्के मते मिळाली तर त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. दुसरीकडे, दुसरा मार्ग म्हणजे 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत 6 टक्क्यांहून अधिक मते मिळायला हवीत.

आम आदमी पक्षाची मते किती? (AAP voters)

राष्ट्रीय पक्ष बनलेल्या आपची दिल्ली, पंजाब आणि दिल्ली एमसीडीमध्ये सरकार आहे. त्याचबरोबर आम आदमी पक्षाचेही गोव्यात दोन आमदार आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने दोन जागा जिंकल्या आणि त्यांना 6.77 टक्के मते मिळाली. आता गुजरातमध्येही आम आदमी पक्षाला जवळपास 13 टक्के मते मिळाली आहेत. अशाप्रकारे, चार राज्यांमध्ये त्यांच्याकडे 6 टक्क्यांहून अधिक मते झाली आहेत आणि तो 8 वा राष्ट्रीय पक्ष बनला आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.