AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदमी एक, उमेदवारी दोन, आपने जाहीर केलेला उमेदवार वंचितच्या यादीत!

वंचित आघाडीने कोल्हापुरातील करवीर विधानसभा मतदारसंघातून आनंद गुरव (Anand Gurav Karveer) यांना उमेदवारी दिली आहे.  मात्र आनंद गुरव (Anand Gurav Karveer) हेच नाव काल ‘आप’च्या यादीतही होतं.

आदमी एक, उमेदवारी दोन, आपने जाहीर केलेला उमेदवार वंचितच्या यादीत!
| Updated on: Sep 24, 2019 | 5:20 PM
Share

मुंबई : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने (VBA candidate first list) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 22 जागांसाठी उमेदवार जाहीर (VBA candidate first list) करण्यात आले आहेत. उमेदवार यादी जाहीर करताना वंचित आघाडीने नावासमोर उमेदवारांची जातही लिहिली आहे.

वंचित आघाडीने कोल्हापुरातील करवीर विधानसभा मतदारसंघातून आनंद गुरव (Anand Gurav Karveer) यांना उमेदवारी दिली.  मात्र आनंद गुरव (Anand Gurav Karveer) हेच नाव काल (23 सप्टेंबर) ‘आप’च्या यादीतही होतं. आपने विधानसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवार जाहीर केले. यामध्येही करवीर विधानसभा मतदारसंघातून आनंद गुरव यांनाच उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे माणूस एक आणि उमेदवारी दोन पक्षातून, असं चित्र पाहायला मिळत आहे.

आनंद गुरव दोन पक्षांचे उमेदवार

आनंद गुरव यांना काल आपने आणि आज वंचितने उमेदवारी दिल्याने, एक व्यक्ती आणि दोन पक्षांची उमेदवारी असं दिसून येत आहे. त्यामुळे आनंद गुरव नेमके कोणत्या पक्षातून लढणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

‘आप’चं म्हणणं काय?

डॉक्टर आनंद गुरव यांनी ‘आप’ कडेही उमेदवारीची मागणी केली होती त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही त्यांना उमेदवारी दिली. त्याच वेळेस त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवाराची मागणी केली होती.  वंचित बहुजन आघाडीनेही त्यांना उमेदवारी दिलेली दिसते, पण आम्ही आमची उमेदवारी मागणी करताना आम्ही उमेदवारांकडून लिहून घेतलं आहे. आम्ही इतरांकडे मागणी केली तरी आम्ही त्याच जागेवरती आपकडून निवडणूक लढवू, त्यामुळे आता आम्ही गुरव यांच्याशी संपर्क करत आहोत त्यांच्याशी संपर्क होत नाही पण ते आपकडूनच निवडणूक लढवतील, अशी माहिती आपचे सचिव  धनंजय शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.

वंचितचं स्पष्टीकरण

आनंद गुरव यांच्या दुहेरी उमेदवारीवर वंचितकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्याप्रमाणे वंचित आणि आपमध्ये निवडणुकीतील युतीबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे आपनेही त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र, स्वतः आनंद गुरव यांनी आपण वंचित बहुजन आघाडीच्या AB फॉर्मवर निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं आहे.

आनंद गुरव नॉट रिचेबल

आप आणि वंचितच्या उमेदवारीबाबत आनंद गुरव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांचा फोन बंद आला. त्यामुळे त्यांची भूमिका काय आहे हे अद्याप स्पष्ट होणे बाकी आहे. मात्र, युतीच्या आधीच उमेदवारांच्या मुद्द्यावर वंचित आणि आपमध्ये स्पर्धा सुरु झाल्याची चर्चा आहे.

कोण आहेत आनंद गुरव?

  • डॉ. आनंद दादु गुरव आयुर्वेदिक डॉक्टर आणि बालरोग तज्ञ आहेत.
  • डाॅ आनंद गुरव असंडोलीकर या नावाने ते परिचीत आहेत
  • श्री रासाई हॉस्पिटलचे ते मालक आहेत
  • शिवाजी विद्यापीठातून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं आहे.
  • त्यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आधीपासूनच प्रचार सुरु केला.
  • करवीर मतदारसंघात त्यांनी शेकडो आरोग्य शिबीरे घेतली आहेत.
  • सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम घेतले आहेत.
  • वैद्यकीय शास्त्रात त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

संबंधित बातम्या 

आदमी एक, उमेदवारी दोन, आपने जाहीर केलेला उमेदवार वंचितच्या यादीत! 

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.