AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटक सीमाप्रश्नावर सरकारची भूमिका काय? मंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं…

अब्दुल सत्तार यांची पत्रकार परिषद, कर्नाटक सीमाप्रश्नावर भाष्य...

कर्नाटक सीमाप्रश्नावर सरकारची भूमिका काय? मंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं...
| Updated on: Dec 10, 2022 | 3:22 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Simavad) दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. त्यावर राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आक्रमकपणे बोलताना दिसत आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून मात्र याबाबत मौन बाळगण्यात आल्याने विरोधीपक्षाकडून टीका होत आहे. यावर मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) बोलते झालेत. त्यांनी सरकारची भूमिका काय हे सांगितलं आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद अनेक वर्षापासून सुरू आहे.मराठी माणसाची अडवणूक करणाऱ्यांना कधीही माफ करणार नाहीत . दोन्ही राज्यात भाजपचं सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सर्व खासदार केंद्राकडे आपलं म्हणणं मांडणार आहेत. केंद्राने तातडीने तोडगा काढणं आवश्यक आहे, असं सत्तार म्हणालेत.

आपल्या राज्याच्या मागणीनुसार केंद्र सरकारने निर्णय घेणं गरजेचं आहे. कर्नाटक सरकारने अडवणूक करू नये. केंद्र सरकारचं म्हणणं लक्षात घ्यायला हवं. कर्नाटक सरकारच्या अशा वागणुकीला कुणीही थारा देणार नाही. कर्नाटक विषयावर सर्वांनी एकत्रित येणं आवश्यक आहे. सर्व पक्ष एकत्रित आले तर केंद्रदेखील महाराष्ट्राची मागणी आवश्य लक्षात घेईल, असं सत्तार यांनी म्हटलंय.

मराठी भाषिक आपले असून कोणावरही अन्याय होणार आम्ही. अमित शाह यांनी पुढाकार घेऊन लक्ष द्यावं. कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही काळजी घ्यावी आणि कोणावर कारवाई करतांना कायदेशीर असावी आणि ज्यांनी कुणावरही अन्याय होऊ देणार नाहीत, असं सत्तार म्हणालेत.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका अशी दिसत आहे आमचं ते आमचं आणि तुमचं तेही आमचंच. ते आक्रमकपणे त्यांची बाजू मांडत आहे. पण आमचे मुख्यमंत्री कुठे आहेत? ते काहीही का बोलत नाहीत? त्यांच्या तोंडाला कुलुप का?, असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला. त्यानंतर मंत्री सत्तार यांनी सरकारची बाजू मांडली आहे.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.