अभिजित बिचुकले कुठे चुकले? 46 मतंच का पडली? भन्नाट उत्तरं पाहा Video

मी पक्षाचं नाव लवकरच जाहीर करणार आहे. लोकांपर्यंत जाईन. मी काही लोकांकडून पैसे मागत नाही. माझ्यासारखी लोकं राजकारणात यावीत म्हणून मी लोकांना प्रेरित करतोय, असं सूतोवाच बिचुकले यांनी केलंय.

अभिजित बिचुकले कुठे चुकले? 46 मतंच का पडली? भन्नाट उत्तरं पाहा Video
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 5:33 PM

अभिजित पोते,  पुणे : भकास कसब्याला  (Kasba Peth)सजवायला मी येत आहे असा प्रचार करत अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अभिजित बिचुकलेंनी उमेदवारी अर्ज भरला. जोरदार प्रचारही केला. मात्र बिगबॉस फेम अभिजित बिचुकले यांना फक्त ४६ मतांवर समाधा मानावं लागलं. बिचुकले यांनी लढवलेली ही पहिलीच निवडणूक नाही. तर यापूर्वी त्यांनी सात ते आठ निवडणुका लढवल्या आहेत. प्रत्येक वेळी हार का पत्करावी लागते, यावर बिचुकले यांनी गंमतीशीर भाष्य केलंय. तसंच कसब्यातील निवडणूकीत झालेल्या पराभवावर माझ्याऐवजी भाजपने, माझे सहकारी देवेंद्र फडणवीस यांनी विचारमंथन करण्याची खरी गरज आहे, असं वक्तव्य बिचुकले यांनी केलंय. याही पुढे जाऊन त्यांनी अजब वक्तव्य केलंय. माझ्या पायगुणामुळेच भाजपचा या निवडणुकीत पराभव झाला, असा दावाही त्यांनी केलाय.

नेमकी चूक कुणाची?

कसबा पेठ पोट निवडणुकीत तुम्ही घरोघरी जाऊन प्रचार केला. पण मतं मिळाली नाहीत. यात नेमकी चूक कुठे झाली, असा प्रश्न विचारला असता बिचुकले यांनी जनतेवर खापर फोडलं. मी नाही चुकलो तर जनता चुकली. प्रचार करण्यासाठी पैसा लागतो. तो माझ्याकडे नाही, असं स्पष्टीकरण बिचुकले यांनी दिलं.

‘… तो माझा पायगुण’

अभिजित बिचुकले म्हणाले, ‘ मला एक गोष्ट सांगायची आहे. आता विचारमंथन मी करण्याऐवजी राजकारणातले ज्येष्ठ सहकारी देवेंद्र फडणवीस यांनी करावं. हा त्यांचा मोठा पराभव आहे. हा माझा पायगुण आहे. पुणे जिल्ह्यातील कसब्यातली निवडणूक मी लढलो आणि भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसला मिळाला. सत्ताधीशांचा पराभव आहे.

उदयनराजेंचा पराभाव…

अभिजित बिचुकले हे साताऱ्याचे आहेत. याआधी त्यांनी उदयनराजेंविरोधात निवडणूक लढवली होती. तेथेही उदयनराजेंचा पराभव माझ्यामुळे झाला, शरद पवार आणि अजित पवारांना त्यांना पाडायचं होतं, असं वक्तव्य बिचुकले यांनी केलं.

आदित्य ठाकरे जिंकले…

तर वरळीतदेखील बिचुकले यांनी आदित्य ठाकरेंविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळचा किस्सा सांगताना बिचुकले म्हणाले, ‘ आदित्य ठाकरे यांना बिनविरोध करायचं असं उद्धव ठाकरे यांनी ठरवलं होतं. पूर्वीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर हे शिवसेनेत गेले. मी बिनविरोध होऊ दिली नाही. मी तसं केलं असतं तर उद्धवसाहेबांनी माझा सत्कार केला असता… तरीही आदित्य ठाकरे जिंकले, असं बिचुकले यांनी सांगितलं.

बिचुकले कुठे चुकले?

आज झालेल्या पराभवात मी नाही तर जनता चुकली, असं वक्तव्य बिचुकले यांनी केलंय. ते म्हणाले, ‘ मी आणि माझ्यासारखे अनेक उमेदवार जेव्हा विधानभवनात येतील, तेव्हा डॉ. बाबासाहेब आणि शिवरायांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडेल. जनता ही लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. आमचे मित्र हेमंत रासने यांचा खूप पैसा गेला. मुख्यमंत्री-देवेंद्रजींचाही पराभव झाला. पण माझी मतं मी ठामपणे मांडतो. ती सगळ्यांना आवडतात. माझं अजून विधानभवनातलं खातंच उघडलं नाही. १३-१४ वर्ष होऊन अनेक पक्षांचे आमदार होत नाहीत. माझं मिशन २०२४ आहे. मी पक्षाचं नाव लवकरच जाहीर करणार आहे. लोकांपर्यंत जाईन. मी काही लोकांकडून पैसे मागत नाही. माझ्यासारखी लोकं राजकारणात यावीत म्हणून मी लोकांना प्रेरित करतोय, असं सूतोवाच बिचुकले यांनी केलंय.

Non Stop LIVE Update
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?.
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.