Breaking News: फडणवीसांच्या सरकारमध्ये मंत्रालयाचं खातेवाटप कसं असणार? भाजपकडे कोणती? शिंदे गटाकडे कोणती? अपक्षांकडे कोणती?

Breaking News : नव्या सरकारमध्ये फडणवीसांकडे नगरविकास आणि गृहखातं राहणार असल्याचं सांगितलं जात आहे, शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन त्यांच्याकडे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातं दिलं जाण्याची शक्यता आहे.

Breaking News: फडणवीसांच्या सरकारमध्ये मंत्रालयाचं खातेवाटप कसं असणार? भाजपकडे कोणती? शिंदे गटाकडे कोणती? अपक्षांकडे कोणती?
फडणवीसांच्या सरकारमध्ये मंत्रालयाचं खातेवाटप कसं असणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 11:15 PM

मुंबई: उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा आज राजीनामा दिल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis)  यांचा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे गटाची साथ घेऊन देवेंद्र फडणवीस सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. त्यामुळे या नव्या सरकारकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्या भाजप सत्ता स्थापनेचा दावा करेल. त्यानंतर 1 जून रोजी फडणवीस-शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेतील सर्व बंडखोर आठ आमदारांना मंत्रीपद दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपच्या (bjp) कमी लोकांना या मंत्रिमंडळात स्थान मिळेल असंही सांगितलं जात आहे. महामंडळांवरही शिंदे समर्थकांना अधिक संधी दिली जाणार आहे. शिंदे समर्थक नाराज होऊन शिवसेनेत जाऊ नये म्हणून हा निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

नगरविकास आणि गृह फडणवीसांकडेच

नव्या सरकारमध्ये फडणवीसांकडे नगरविकास आणि गृहखातं राहणार असल्याचं सांगितलं जात आहे, शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन त्यांच्याकडे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातं दिलं जाण्याची शक्यता आहे. अर्थ खातं हे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेच दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दादा भुसेंकडे कृषी तर उदय सामंत यांच्याकडे शिक्षण खातचं ठेवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दीपक केसरकर यांनाही चांगलं खातं दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा

बच्चू कडू, शंभुराज, सत्तारांना बढती

नव्या सरकारमध्ये बच्चू कडू, शंभुराज देसाई आणि अब्दुल सत्तार या राज्यमंत्र्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी या नेत्यांनी शिंदे यांच्याकडे फुल लॉबिंग केल्याचं सांगितलं जात आहे.

सत्तेचा फॉर्म्युला काय असेल?

शिंदे यांच्याबरोबर भाजपचा सत्तेचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानुसार भाजपकडे 29 मंत्री असतील. तर शिंदे गटाला 13 मंत्रिपदे देण्यात येणार आहेत. त्यात 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रिपदांचा समावेश आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून कुणा कुणाला मंत्रिपदे मिळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पंकजा मुंडेंना स्थान मिळणार नाही?

दरम्यान, नव्या सरकारमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना संधी दिली जाणार नसल्यांच सांगितलं जात आहे. पंकजा मुंडे या कोणत्याही सभागृहाच्या सदस्या नाहीत. शिवाय त्या राष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत. मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

अपक्षांना संधी

शिंदे सरकारमध्ये ठरावीक अपक्षांना संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळेल. इतर अपक्षांना महामंडळांवर खूश केलं जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे या नव्या मंत्रिमंडळाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजपचे संभाव्य मंत्री

देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील सुधीर मुनंगटीवार प्रवीण दरेकर गिरीश महाजन आशिष शेलार गोपीचंद पडळकर चंद्रशेखर बावनकुळे राम शिंदे नितेश राणे

शिंदे समर्थक संभाव्य मंत्री

एकनाथ शिंदे दीपक केसरकर उदय सामंत दादा भुसे संदीपान भुमरे गुलाबराव पाटील बच्चू कडू संजय राठोड अब्दुल सत्तार शंभुराज देसाई प्रताप सरनाईक

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.