Ajit Pawar : अरे थांब ना बाबा, तुलाच फार कळतंय का? आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का?; अजितदादांनी सत्ताधारी आमदाराला फटकारलं

राजेंद्र खराडे

राजेंद्र खराडे |

Updated on: Aug 22, 2022 | 6:52 PM

पावसाळी अधिवेशनात आपल्या आक्रमक स्वभावामुळे अजित पवार हे चर्चेत राहिलेले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात आपले मत मांडत असताना शंभूराजे देसाई यांनी हस्तक्षेप केला होता. त्यावेळी अजित पवार यांनी त्यांना सुनावले होते. आपण एकत्र काम केलेले आहे. असे बोलत असताना मध्येच बोलू नये म्हणत त्यांनी शंभूराजेंना फटकारले होते. त्यामुळे अजित पवार हे सत्तेत असो की विरोधी बाकावर आपल्या आक्रमक स्वभावामुळे ते कायम चर्चेत राहिलेले आहेत.

Ajit Pawar : अरे थांब ना बाबा, तुलाच फार कळतंय का? आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का?; अजितदादांनी सत्ताधारी आमदाराला फटकारलं
विरोधी पक्षनेते अजित पवार

मुंबई : रोखठोक आणि स्पष्टोक्तेपणा म्हणून (Ajit Pawar) अजित पवार यांची ख्याती सबंध महाराष्ट्रभर ओळख आहे. ज्याप्रमाणे (Administration) प्रशासनावर त्यांचा प्रभाव आहे अगदी त्याचप्रमाणे विरोधकांच्या बाबतीत त्यांचा गाढ अभ्यास आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री पदावरुन पायउतार होऊन देखील कामाचा दबदबा आणि विरोधकांवरही दबाव ते कायम ठेऊ शकले आहेत. गतआठवड्यात (Monsoon Session) सभागृह सुरु असतानाच त्यांनी मंत्री शंभूराजे देसाई यांना सुनावले होते तर आज महाविकास आघाडी सरकारच्या काळात 25/ 15 निधी वाटपाबाबत ते खुलासा करीत असताना विरोधी बाकावरुन त्यांच्या बोलण्यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्या दरम्यानही, पुढे कोण याची पर्वा न करता त्यांनी आपल्या शैलीत विरोधकांना सुनावले, ते म्हणाले की जे बोलायचे ते उठून बोलायचे..थांब रे तुलाच लई कळतंय का असे म्हणत त्यांनी फटकारले. त्यावरुन अजित पवार यांचा आक्रमकपणा पुन्हा समोर आला आहे.

नेमके काय झालं सभागृहात?

विरोधी पक्षनेते अजित पवार हे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील 25/15 च्या निधी वाटपाबद्दल सांगत होते. महाविकास आघाडीमध्ये 25/15 मध्ये मविच्या आमदरांना 5 कोटीच्या निधीचे वाटप करण्यात आले होते, ते मी कबुल करतो असेही पवार म्हणाले, तर त्याच वेळी विरोधी पक्षातील आमदारांच्या याद्या घेऊन त्यांनाही 2 कोटी रुपये दिल्याचे त्यांनी आठवण करुन दिले पण दरम्यान त्यांचे हे विधान ऐकूण सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. गोंधळ वाढत असतानाच अरे थांब ना बाबा, तुलाच फार कळतंय का? आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का? असे ते म्हणाले.

शंभूराजेंनाही पवारांनी फटकारले होते..

पावसाळी अधिवेशनात आपल्या आक्रमक स्वभावामुळे अजित पवार हे चर्चेत राहिलेले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात आपले मत मांडत असताना शंभूराजे देसाई यांनी हस्तक्षेप केला होता. त्यावेळी अजित पवार यांनी त्यांना सुनावले होते. आपण एकत्र काम केलेले आहे. असे बोलत असताना मध्येच बोलू नये म्हणत त्यांनी शंभूराजेंना फटकारले होते. त्यामुळे अजित पवार हे सत्तेत असो की विरोधी बाकावर आपल्या आक्रमक स्वभावामुळे ते कायम चर्चेत राहिलेले आहेत. शिवाय सत्ताधाऱ्यांच्या कामावरही त्यांचे बारीक लक्ष असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

हे सुद्धा वाचा

सभागृहाची एक शिस्त असते

सभागृहाचे कामकाज हे नियमात असावे यासाठीही अजित पवार यांचा आग्रह राहिलेला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातच सत्ताधारी हे अधिविशेन सुरु असतानाच सभागृह सोडून बाहेर जात होते. यावर देखील अजित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. सभागृहात सुरु असलेल्या कामाकाजाबद्दल सत्ताधारी किती गंभीर आहेत अशी विचारणा त्यांनी केली होती.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI