AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिशा सालियान मृत्यूप्रकरणावरून सभागृहात गोंधळ, अजित पवार म्हणाले “सत्ताधारी पक्षाने गोंधळ घालायचा नसतो, तुम्ही तर…”

आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी, अजित पवार यांनी उत्तर दिलं...

दिशा सालियान मृत्यूप्रकरणावरून सभागृहात गोंधळ, अजित पवार म्हणाले सत्ताधारी पक्षाने गोंधळ घालायचा नसतो, तुम्ही तर...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 22, 2022 | 1:34 PM
Share

नागपूर : सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून (Sushant Singh Rajput Death Case) राज्यातील राजकारण तापलंय. सत्ताधाऱ्यांकडून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे. यावरून सभागृहात गोंधळ (Assembly Winter Session) पाहायला मिळाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“सत्ताधारी पक्षाने गोंधळ घालायचा नसतो. त्यांनी विरोधकांच्या, जनतेच्या प्रश्नांची उत्तर द्यायची असतात. इथं उलटं दिसत आहे. सत्ताधारीच विधिमंडळात गोंधळ घालत आहेत”, असं अजित पवार म्हणालेत.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी शिंदेगट आणि भाजपकडून करण्यात येत आहे. विशेषत: नितेश राणे यांनी ही मागणी लावून घरली आहे. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा हे कुणाचीही नार्को टेस्ट करायला सांगतील. ते उद्या तुमचीही नार्को टेस्ट करण्याची मागणी करतील. नार्को टेस्ट करण्याचं कारण काय? असं चालत नाही, असं अजित पवार म्हणालेत.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात जसं आफताब पुनावालाची नार्को टेस्ट झाली आणि सत्य बाहेर आलं. तसंच आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा. सुशांतसिंह केसमधील सत्य समोर येईल, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. त्याला अजित पवार यांनी उत्तर दिलंय.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनात पाहायला मिळाले. भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी विधानसभेत बोलताना हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर विधिमंडळात गोंधळ पाहायला मिळाला. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची केस रिओपन करा. या प्रकरणाची पुन्हा एकदा कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी सभागृहात केली. त्यानंतर गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच