‘भावी मुख्यमंत्री’ आणि त्यावर सासुरवाडीचा आग्रह यावर काय म्हणाले अजित पवार?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कृतीवर आता अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मोलाचा सल्लादेखील दिलाय.

'भावी मुख्यमंत्री' आणि त्यावर सासुरवाडीचा आग्रह यावर काय म्हणाले अजित पवार?
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 7:07 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज अखेर कार्यकर्त्यांच्या भावी मुख्यमंत्र्याच्या बॅनरवर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. “मुख्यमंत्रीपदाचे बॅनर्स अजिबात लावण्यात येऊ नयेत. आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीची अपेक्षा केलेली आहे. असे बॅनर लावून कुणी मुख्यमंत्री होत नसतं. मुख्यमंत्री ज्याला बनायचंय त्याला 145 ची मॅजिक फिगर निर्माण करावी लागते जी एकनाथरावांनी वेगवेगळ्या कृल्पत्या वापरुन केली म्हणून ते मुख्यमंत्री झाले. कुणालाच वाटलं नव्हतं की एकनाथ शिंदे अशाप्रकारे मुख्यमंत्री होतील. पण ते झाले”, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

“मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक, सासुरवाडीमध्ये माझ्यावर प्रेम ओतू चाललंय, म्हणून सासुरवाडीच्या सहकाऱ्यांनाही आवाहन करेन की, असं करु नका. हा तुमचा चुकीचा आग्रह आहे. यातून काही होणार नाही. आपलं काम करत चला. आमदारांची संख्या वाढवा.जिथे जेवढे जास्त आमदार तुमच्या विचारांचे निवडून येतील तिथे तुम्हाला अशी पदं मिळायला हरकत लागतील. तसेच जर वरिष्ठांनी आशीर्वाद दिले, आमदारांनी तुमचं सिलेक्शन होऊ शकेल”, असं अजित पवार म्हणाले.

यावेळी पत्रकारांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मुख्यमंत्री व्हावं, असं म्हटलं होतं. त्यावर अजित पवारांनी आपली भूमिका मांडली. “जयंत पाटील सुद्धा आमच्याच पक्षाचे आहेत. अमोल कोल्हे यांच्या दृष्टीने जयंत पाटील हे जास्त योग्य आणि उत्तम मुख्यमंत्री आहेत, असं त्यांचं मत दिसतंय. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं लोकशाहीत अधिकार आहे. संविधानाने तो अधिकार तुम्हाला दिला आहे”, असं अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? अजित पवार यांचं मिश्किल उत्तर

यावेळी एका पत्रकाराने अजित पवार यांच्यामते कोण चांगला मुख्यमंत्री होऊ शकतो? असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. “तू चांगला मुख्यमंत्री होऊ शकतो”, असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. त्यानंतर अजित पवार यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली.

“अहो, माझ्या सहकाऱ्यांनो, कुणाची किती इच्छा, जसं तुमची इच्छा ही तुम्ही ज्या कार्यक्रमात काम केलं तिथे संपादकपद मिळावं अशी तुमची इच्छा असते. तसंच राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला वाटतं”, असं पवार म्हणाले.

“जे केंद्रीय पातळीवर काम करतात त्यांना भारतात आपल्याला केंद्रीय मंत्रीपद मिळावं असं वाटतं, तसेच तेवढा ताकदीचा नेता असेल तर त्यांना आपण पंतप्रधान व्हावं असं वाटतं असेल. तसंच राज्यात अनेकांना आपण मंत्रिमंडळात राहवं असं वाटतं. काहींना वाटतं की, आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळवून विकास साधण्याचा संकल्प असतो”, असं अजित पवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.