Ajit Pawar Video : तृतीयपंथीसुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो, अजित पवारांचं दानवेंच्या ‘ब्राह्मण मुख्यमंत्री’ प्रेमावर वक्तव्य

'मुख्यमंत्री कुठल्या जातीच्या व्यक्तीने व्हावं, हे कुणीही होऊ शकतं. तृतीयपंथीयही मुख्यमंत्री होऊ शकतो किंवा कुठल्या जाती धर्माची व्यक्तीही मुख्यमंत्री होऊ शकते', असं अजित पवार यांनी म्हटलंय.

Ajit Pawar Video : तृतीयपंथीसुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो, अजित पवारांचं दानवेंच्या 'ब्राह्मण मुख्यमंत्री' प्रेमावर वक्तव्य
रावसाहेब दानवे, राज ठाकरेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 5:18 PM

पुणे : राज्यात सध्या हिंदुत्व, मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) या तीन मुद्द्यांवरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जातीवादाचा गंभीर आरोप केला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. आता अजितदादा यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय. ‘मी ब्राह्मणाला केवळ नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही. तर ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो, असं दानवे म्हणाले होते. त्यावर आता ‘मुख्यमंत्री (Chief Minister) कुठल्या जातीच्या व्यक्तीने व्हावं, हे कुणीही होऊ शकतं. तृतीयपंथीयही मुख्यमंत्री होऊ शकतो किंवा कुठल्या जाती धर्माची व्यक्तीही मुख्यमंत्री होऊ शकते’, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ‘मुख्यमंत्री कुठल्या जातीच्या व्यक्तीने व्हावं, हे कुणीही होऊ शकतं. तृतीयपंथीयही मुख्यमंत्री होऊ शकतो किंवा कुठल्या जाती धर्माची व्यक्तीही मुख्यमंत्री होऊ शकते. महिलाही मुख्यमंत्री होऊ शकते, आपणही मुख्यमंत्री होऊ शकता. 145 चं बहुमत आणा आणि राज्याचं प्रमुख व्हा. असं कुणी काहीही सांगेन, की अमक्याने व्हावं, तमक्याने व्हावं. अरे त्यांनी 145 आमदार त्यांच्या पाठिशी उभे केले तर होतील ना ते मुख्यमंत्री किंवा ती व्यक्ती’, असं अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणाले होते?

रावसाहेब दानवे हे 3 मे रोजी परशुराम जयंती निमित्त जालना येथे ब्राह्मण समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, ‘मी केवळ ब्राह्मणाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही तर ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो. या देशाला दिशा देण्याचे काम देखील ब्राम्हण समाजाने केले’, असं रानवे म्हणाले होते.

‘अल्टिमेटमची भाषा कुणी करु नये’

अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका केलीय. महाराष्ट्रात अल्टिमेटमची भाषा कुणी करु नये. सरकार कायद्याने चालतं. अल्टिमेटम दिला तर गृहमंत्र्यांनी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. मी एका भाषेत बोललो होतो की उद्या सगळ्यांना निर्णय बंधनकारक आहेत. वेगवेगळ्या समाजाला तो नियम लागू असेल. आम्ही सांगतो होतो की अशी भाषा करु नका, कारण कायद्याने, नियमानं राज्य चालतं. जो काही निर्णय होईल तो सर्वांना बंधनकारक असेल, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.