नारायण राणे म्हणाले, सीएम बीएम गेला उडत, आता अजित पवारांचं रोखठोक उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिलं.

नारायण राणे म्हणाले, सीएम बीएम गेला उडत, आता अजित पवारांचं रोखठोक उत्तर
Ajit Pawar_Narayan Rane
सुनील काळे

| Edited By: सचिन पाटील

Jul 29, 2021 | 12:45 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिलं. ” काही नेतेमंडळी पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. प्रत्येकाला हा दौरा करण्याचा अधिकार आहे. आम्हीही विरोधात असताना दौरे केले. पण त्यावेळी जिल्हाधिकारी कुठे आहे, तहसीलदार कुठे आहे, प्रांत कुठे आहे, याची विचारणा करत बसलो नाही. मात्र काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही वापरली नव्हती”, असं अजित पवार म्हणाले.

ते लोक दौरा अधिकार्‍यांना पाहण्यासाठी करतात का? मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही, कुणीही वापरली नव्हती. यशवंतराव चव्हाणांपासून, शरद पवारांपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. मात्र अशी भाषा कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी वापरली नाही, असा हल्लाबोल अजित पवारांनी केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपळूण दौऱ्यात फोन करुन जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही उपस्थित का नाही असा सवाल केला होता. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यस्त असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुन नारायण राणेंनी “तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका” अशी भाषा वापरली होती.

अजित पवारांचा हल्लाबोल

याबाबत अजित पवार म्हणाले, “प्रत्येकाला घटनास्थळी जाण्याचा अधिकार आहे, मात्र व्हीआयपी व्यक्तींनी कलेक्टर पाहिजे, अधिकारी पाहिजे असा आग्रह धरू नये. – जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना कामं करण्याची मुभा मिळाली पाहिजे. इतर नेत्यांना दौरा करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी आम्ही आता नोडल ऑफिसर ठेवला आहे”

अजित पवार यांच्या पत्रकार संवादातील महत्त्वाचे मुद्दे

– तातडीने पूरग्रस्तांना मदत व्हायला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला
– जिल्हाधिकारी आणि इतर अधिकार्यांना कामं करण्याची मुभा मिळाली पाहिजे
– इतर नेत्यांना दौरा करण्याचा अधिकार आहे
– काही भागात आजही पाणी आहे, त्यामुळे तिथले पंचनामे बाकी आहेत
– ते पाणी ओसरले की तातडीने पंचनामे केले जातील
– प्रत्येकाला जाण्याचा अधिकार आहे, ती व्हीआयपी व्यक्तीने कलेक्टर पाहिजे असा आग्रह धरू नये
– अजूनही अंदाज सांगता येत नाही
– अजुनही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे
– तसा निर्णय काल मंत्रीमंडळाने घेतला
– तज्ज्ञांची समिती नेमून भूगर्भात काही बदल होतायत का याचा अभ्यास करण्याबाबत कालच्या बैठकीत चर्चा झाली
– फक्त आपल्या राज्यात घडतंय असं नाही, उत्तराखंडला घडलं
– आम्ही आताच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार केला जाईल
– तो केंद्राला पाठवला जाईल
– केंद्राने गुजरातला १ हजार कोटी तातडीने जाहीर केले
– तसं महाराष्ट्रला मदत जाहीर करता येईल
– केंद्राने दिलेले ७०० कोटी २०२० चे आहेत, त्याचा पूराशी दुरान्वये संबंध नाही
– मदत देण्यात दिरंगाई झालेली नाही
– तातडीने मदत करण्याची कार्यवाही सुरू आहे
– ते लोक दौरा अधिकार्‍यांना पाहण्यासाठी करतात का
– मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा वापरली नव्हती
– टास्क फोर्सची बैठक होऊन
– पॉझिटिव्हीटी दर काय आहे
– कोरोना कमी होतोय का
– याबाबत मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करतील
– नंतर जिथे कोरोना अर्धा, पाव, एक टक्का आलाय तिथे योग्य तो विचार करू असं मुख्यमंत्र्यांनी काल मंत्रीमंडळ बैठकीत सांगितलं
अजित पवार
– जयंत पाटील सुखरूप आहेत
– थोड्या वेळात त्यांना रुग्णालयातून घरी सोडलं जाईल
– सर्व यंत्रणा तत्परतेने कामाला लावलेली आहे

VIDEO : नारायण राणे काय म्हणाले होते? 


संबंधित बातम्या 

Video: सीएम बीएम गेला उडत, आम्हाला नावं नका सांगू कुणाची? राणे जिल्हाधिकाऱ्यावर संतापले  

VIDEO | थांब रे, मध्ये बोलू नको, नारायण राणेंनी फडणवीसांसमोरच प्रवीण दरेकरांना गप्प केलं  

नारायण राणेंच्या अधिकाऱ्यांवरील संतापावर अजितदादांचा उतारा, मंत्र्यांच्या दौऱ्यासोबत ‘हा’ अधिकारी ठेवण्याचा निर्णय

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें