AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | थांब रे, मध्ये बोलू नको, नारायण राणेंनी फडणवीसांसमोरच प्रवीण दरेकरांना गप्प केलं

नारायण राणे हे  प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पूरग्रस्त चिपळूणची पाहणी करत असताना हा प्रकार घडला. राणे अधिकाऱ्यांना झापत होते. त्यावेळी दरेकरांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी थांबवल्याचा अंदाज आहे.

VIDEO | थांब रे, मध्ये बोलू नको, नारायण राणेंनी फडणवीसांसमोरच प्रवीण दरेकरांना गप्प केलं
राणेंनी दरेकरांना गप्प केलं
| Edited By: | Updated on: Jul 28, 2021 | 8:56 AM
Share

चिपळूण : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी नुकताच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या साथीने पूरग्रस्त चिपळूणचा (Chiplun Floods) दौरा केला. यावेळी राणे अधिकाऱ्यांना झापत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मात्र त्यात मध्ये बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवीण दरेकरांनाही राणेंनी गप्प केलं. “थांब रे मध्ये बोलू नको” असं राणे दरेकरांना बोलत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. राणेंनी आपल्याच पक्षातील बड्या नेत्याला सर्वांसमक्ष गप्प राहण्याची सूचना केल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे.

नारायण राणे हे  प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पूरग्रस्त चिपळूणची पाहणी करत असताना हा प्रकार घडला. पूरग्रस्तांच्या डोळ्यात अश्रू असताना तुम्ही दात काढता, ऑफिसमध्ये काय करता, तिथे का नाही आलात, असे प्रश्न विचारत राणे अधिकाऱ्यांना झापत होते. त्यावेळी दरेकरांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी थांबवल्याचा अंदाज आहे.

काय म्हणाले नारायण राणे?

(अधिकाऱ्यांना उद्देशून) तुम्हाला सोडू का, त्या मॉबमध्ये सोडू का आता? (प्रवीण दरेकरांच्या दिशेने हात करत) थांब रे मध्ये बोलू नको (प्रवीण दरेकरांनी हलकीशी मान डोलावली) (पुन्हा अधिकाऱ्यांना उद्देशून) मॉबमध्ये सोडून येऊ? काय चेष्टा समजली? एवढी लोकं रडत आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत मग, त्यांचं आयुष्य उद्धवस्त झालं आणि तुम्ही हसताय. दात काढताय? (अधिकाऱ्याचं उत्तर – हसत नाही सर, मी पहिल्यापासूनच इथे) इथं काय करताय. इकडे ऑफिसमध्ये काय? तिकडे यायला पाहिजे ना तुम्ही चला दाखवा ऑफिस तुमचं कुठं आहे

पाहा व्हिडीओ :

नारायण राणेंचा जिल्हाधिकाऱ्यांवर संताप

याआधी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या दौऱ्यात जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित नसल्यानं संताप व्यक्त केला होता. नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, “तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा.”

संबंधित बातम्या:

Video: सीएम बीएम गेला उडत, आम्हाला नावं नका सांगू कुणाची? राणे जिल्हाधिकाऱ्यावर संतापले

नारायण राणेंच्या अधिकाऱ्यांवरील संतापावर अजितदादांचा उतारा, मंत्र्यांच्या दौऱ्यासोबत ‘हा’ अधिकारी ठेवण्याचा निर्णय

(Narayan Rane stops Pravin Darekar from talking on Chiplun Flood affected area visit in front of Devendra Fadnavis)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.