माईकमध्ये बिघाड, फडणवीस म्हणाले, माझा आवाज कोणी दाबू शकत नाही, बाजूला बसलेल्या अजितदादांना हसू आवरेना

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यातील बाणेर इथे कोव्हिड सेंटरचं उद्घाटन झालं. Devendra Fadnavis and Ajit Pawar at Pune

माईकमध्ये बिघाड, फडणवीस म्हणाले, माझा आवाज कोणी दाबू शकत नाही, बाजूला बसलेल्या अजितदादांना हसू आवरेना
Follow us
| Updated on: Aug 28, 2020 | 1:22 PM

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यातील बाणेर इथे कोव्हिड सेंटरचं उद्घाटन झालं. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच एका मंचावर येत असल्याने, राजकीय वर्तुळाच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. (Devendra Fadnavis and Ajit Pawar at Pune)

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस भाषण करताना माईकमधून आवाज येत नव्हता. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आवाज आवाज असं सांगितलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मास्क खाली घेऊन, माझा आवाज कोणी दाबू शकत नाही, असे म्हणताच देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला असलेले अजित पवार यांना हसू आवरता आले नाही.

वाचा : फडणवीसांचा परीक्षांवरुन युवासेनेवर निशाणा, तर सुशांतप्रकरणी मुंबई पोलिसांकडे बोट

दरम्यान, त्याआधी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजनयुक्त 200 बेडच्या रुग्णालयाचं उद्घाटन झालं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना, देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली.

फडणवीस म्हणाले, “राज्यात दररोज जवळपास 15 हजार कोरोना रुग्ण आढळत आहेत. संसर्गाचा दर हा 15 टक्के आहे, हे चिंताजनक आहे. आजही आपला मृत्यूदर हा 3.2 टक्के आहे, जो देशापेक्षा जास्त आहे. टेस्टिंग वाढवण्याची गरज आहे. पुणे जिल्ह्यात टेस्टिंग समाधानकारक असलं तरी मुंबईत टेस्टिंग खूप कमी आहे”.

परीक्षांचा निर्णय योग्य

शेवटच्या वर्षाच्या परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला तो योग्य आहे. युवा सेनेच्या आग्रहाखातर महाराष्ट्र सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. परीक्षा झाली नसती तर भविष्यात या मुलांच्या डिग्रीला कोणतंही महत्व राहिलं नसतं. त्यामुळे या निर्णयाने आमच्या विद्यार्थ्यांचा फायदाच होईल, असं फडणवीस म्हणाले.

अजित पवारांची टोलेबाजी

“देवेंद्र फडणवीस आणि मी, आम्ही दोघे कार्यक्रमाला येणार म्हणून ब्रेकिंग न्यूज येत होती. त्यांना माहीत नव्हतं, की भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही येणार आहेत म्हणून” अशी टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी केली.

(Devendra Fadnavis and Ajit Pawar at Pune)

संबंधित बातम्या 

“फडणवीस आणि मी एकत्र येणार म्हटलं, की लगेच ब्रेकिंग न्यूज” अजितदादांची टोलेबाजी

फडणवीसांचा परीक्षांवरुन युवासेनेवर निशाणा, तर सुशांतप्रकरणी मुंबई पोलिसांकडे बोट 

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.