मुख्यमंत्र्यांच्या सभेला भाडोत्री गर्दी, प्रत्येकाला किती मोजले?; अंबादास दानवेंनी सांगितला आकडा

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी भाड्यानं लोक आणले जात असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या सभेला भाडोत्री गर्दी, प्रत्येकाला किती मोजले?; अंबादास दानवेंनी सांगितला आकडा
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 3:24 PM

औरंगाबाद : उद्या पैठणमध्ये (Paithan) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची सभा होणार आहे. मात्र ही सभा चांगलीच चर्चेत आली आहे. या सभेबाबत एक पत्र व्हायरलं झालं होतं. या पत्रामध्ये तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेला यावे अशी सूचना देण्यात आली होती. मात्र हे पत्र बनावट असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी भाड्यानं लोक आणले जात असल्यांचं दानवे यांनी म्हटलं आहे.

दानवेंनी नेमकं काय म्हटलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या पैठणमध्ये सभा होणार आहे. या सभेवरून अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभेला तुफान गर्दी झाली होती. मात्र पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीपान भूमरे यांच्या सभेला गर्दी झाली नाही. जेमतेम शंभर लोकही नव्हते.

त्यामुळे आता शक्तिप्रदर्शन करण्यासाठी एकनाथ शिंदे हे पैठणमध्ये सभा घेत आहेत. मात्र सभेला गर्दी जमवण्यासाठी यांना भाड्यानं लोक आणावे लागत आहेत. सभेला येण्यासाठी प्रत्येकाला दीड हजार रुपये दिले जात असल्याचा दावा  देखील अंबादास दानवे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

ते पत्र बनावट

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये उद्या सभा होणार आहे. या सभेबाबत एक पत्र व्हायरलं झालं आहे. या पत्रातून अंगनवाडी सेविकांना मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पत्रावरून वाद निर्माण झाल्यानंतर शिंदे गटाकडून या पत्राबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.  हे पत्र बनावट असून, यामाध्यमातून बदनामीचा प्रयत्न सुरू असल्याचं शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.