AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प. पू. महंत स्वामी महाराज यांचा ९२ वा जन्मजयंती महोत्सव थाटात संपन्न, गिनिज वर्ल्ड रेकॉर्डतर्फे सन्मान

वडोदरा येथे प.पू. महंत स्वामी महाराज यांचा ९२ वा जन्मजयंती महोत्सव भव्य सोहळा साजरा झाला. यावेळी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्यावतीने प.पू. महंत स्वामी महाराज यांना सन्मानपत्र अर्पण करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव देखील उपस्थित होते.

प. पू. महंत स्वामी महाराज यांचा ९२ वा जन्मजयंती महोत्सव थाटात संपन्न, गिनिज वर्ल्ड रेकॉर्डतर्फे सन्मान
प.पू.महंत स्वामी महाराज यांचा ९२ वा जन्मजयंती महोत्सव
| Updated on: Feb 02, 2026 | 8:06 PM
Share

बीएपीएस स्वामिनारायण संस्थाद्वारा आज सोमवार २ फेब्रुवारी,२०२६ रोजी वडोदरा येथे परम पूज्य महंत स्वामी महाराज यांचा ९२ वा जन्म जयंती महोत्सव भव्य पद्धतीने साजरा करण्यात आला. या महोत्सवाला विशेष पाहुणे म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री भूपेन्द्रभाई पटेल आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव उपस्थित होते. यावेळी हिंदू ग्रंथाच्या सर्वात विराट समुहगायनासाठी गिनीस वर्ल्ड रिकॉर्डद्वारा परम पूज्य महंत स्वामी महाराज यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

प.पू.महंत स्वामी महाराज यांचा ९२ वा जन्मजयंती महोत्सव मोठ्या वडोदरा येथे सोमवारी उत्साहात आणि अनोख्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. प.पू. महंत स्वामी महाराजांची वाणी, प्रभाव, निरहंकारी वृत्ती आणि उच्च आध्यात्मिक स्थिती दर्शविणाऱ्या विशेष व्हिडिओसह, B.A.P.S. ( बीएपीएस ) संस्थेच्या वरिष्ठ संतांनी प.पू. महंत स्वामी महाराजांचे दिव्य जीवन, गुण आणि कार्यावर प्रकाश टाकणारे विचार सांगितले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचे बीएपीएस संस्थेच्या वरिष्ठ संतांनी स्वागत केले.

प.पू.महंत स्वामी महाराजांच्या प्रेरणेने बीएपीएस संस्थेच्या ३ वर्षे ते १३ वर्षे वयोगटातील १५,००० पेक्षा जास्त मुलांनी ‘सत्संगदीक्षा’ ग्रंथाचे अवघ्या एक वर्षात संस्कृतमध्ये संपूर्ण पाठांतर ( मुखपाठ ) केले आहे. महंत स्वामी महाराजांनी रचलेल्या ३१५ श्लोकांचा हा ‘सत्संग दीक्षा’ ग्रंथ उन्नत आध्यात्मिक, नैतिक, सामाजिक आणि व्यावहारिक जीवनाची प्रेरणा देतो.एखाद्या संस्कृत ग्रंथाच्या लेखकाच्या प्रत्यक्ष उपस्थितीत १५,६६६ बालकांनी केवळ एका वर्षात संपूर्ण ग्रंथ, म्हणजेच ३१५ श्लोक तोंडपाठ करणे आणि त्याचे समूहगान करणे, ही एक ऐतिहासिक आणि विरळ घटना असल्याचे म्हटले जात आहे.

याप्रसंगी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पाठवलेल्या शुभेच्छा पत्रांचे वाचन करण्यात आले. परम पूज्य महंत स्वामी महाराजांच्या जन्मदिनानिमित्त गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आपल्या शुभेच्छा अर्पण केल्या आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले.परम पूज्य महंत स्वामी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या जबलपूरचा उल्लेख करत मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अभिमान वाटत असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.

यावेळी मंत्रपुष्पांजलीद्वारे सर्व भक्तांनी प.पू. महंत स्वामी महाराजांच्या चरणी गुरुभक्ती अर्ध्य अर्पण केले. परम पूज्य महंत स्वामी महाराजांनीही सर्वांना उन्नत आध्यात्मिक जीवनाची प्रेरणा देत आशीवार्द दिले. कार्यक्रमाच्या शेवटी लाखो दिव्यांच्या लखलखाटात झालेल्या समूह आरतीमुळे एक हृदयस्पर्शी वातावरण निर्माण झाले.या जन्मजयंती सोहळ्यात बीएपीएसचे ८०० संत तसेच सुमारे दोन लाख भक्त घटनास्थळी उपस्थित होते.या भव्य आयोजनासाठी तीन महिन्यांहून अधिक काळ व्यापक नियोजन आणि तयारी सुरू होती, ज्यामध्ये बीएपीएसच्या शेकडो संतांनी आणि ३४ विविध सेवा विभागांच्या १४,००० स्वयंसेवकांनी अविरत सेवा दिली.

कार्यक्रमाची रेलचेल

‘हर घर घर शिक्षा की ज्योत जले’ या उपक्रमांतर्गत आदिवासी क्षेत्रांसाठी प.पू. महंत स्वामी महाराजांनी ‘मोबाईल पाठशाळे’चा ( Mobile Pathshala ) शुभारंभ यावेळी केला. बीएपीएस (BAPS) संस्थेद्वारे मुलांसाठी विशेष ‘BAPS Kids’ या यूट्यूब चॅनेलचा शुभारंभही करण्यात आला. प.पू. महंत स्वामी महाराज रचित ‘इन्साईट्स फ्रॉम द सत्संग दीक्षा’ (Insights from the Satsang Diksha) या ग्रंथाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

गिनिस वर्ल्ड रेकॉर्ड सन्मान:

‘हिंदू ग्रंथाचे सर्वात मोठे समूहगानाच्या रेकॉर्ड (Largest Simultaneous Hindu Text Recital) बद्दल या महोत्सवात इंग्लंडहून आलेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकाऱ्यांनी प.पू.महंत स्वामी महाराजांचा सन्मान केला गेला.

या ऐतिहासिक महोत्सवासाठी वडोदरा महानगरपालिकेने सुरक्षा, सुरक्षितता आणि आवश्यक सेवांच्या बाबतीत पूर्ण सहकार्य दिले.या सोहळ्यातून सर्वांनी विनम्रता, श्रद्धा आणि निस्वार्थ सेवेच्या भावनेने जीवन जगण्याची प्रेरणा घेतली. हा महोत्सव भारत तसेच परदेशात राहणाऱ्या असंख्य भक्तांनी live.baps.org आणि ‘आस्था भजन’ चॅनेलद्वारे थेट प्रक्षेपणाद्वारे (Live) पाहिला.

Follow Us
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट.
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया.
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार.